दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात घसरण! खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या आजचे दर?
Marathi October 09, 2024 08:24 PM

सोने चांदी दर बातम्या: सोनं चांदी (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) काहीशी घसरण झाली आहे. त्यामुळं खरेदीदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. सध्या सोन्याचा भाव 74 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. तर चांदीचा भाव हा 88 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 74834 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 88290 रुपये प्रति किलो आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, काल 8 ऑक्टोबरला 24 कॅरेट सोन्याचा दर हा 75726 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज यामध्ये घसरण जाली आहे. आज सोन्याचा दर हा 74834 रुपयांपर्यंत घसरला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत. सोन्याच्या दरात 892 रुपयांची घसरण झाली आहे.

आज सोन्या-चांदीचा भाव किती?

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज सकाळी 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 74534 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचवेळी 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 68548 रुपये झाली आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या (18 कॅरेट) सोन्याचा भाव 56126 पर्यंत खाली आला आहे. त्याचवेळी 585 शुद्धतेचे (14 कॅरेट) सोने आज 43778 रुपयांवर स्वस्त झाले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीची किंमत आज 88290 रुपये झाली आहे.

सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी का.य करावं?

शनिवार आणि रविवारी सोन्याचे दर जाहीर केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, तुम्ही सतत अपडेट्ससाठी www.ibja.co किंवा ibjarates.com तपासू शकता.

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.