IND vs BAN : टीम इंडियाला पावरप्लेमध्ये 3 झटके, संजू, अभिषेक आणि सूर्या आऊट
GH News October 09, 2024 10:14 PM

बांगलादेशने दुसऱ्या आणि निर्णायक टी 20I सामन्यात टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. संजू समॅसन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा केल्या. मात्र त्यानंतर बांगलादेशने दणक्यात कमबॅक करत टीम इंडियाला सलग 2 षटकांमध्ये 2 धक्के देत सलामी जोडीला तंबूत पाठवलं आहे. संजू सॅमसननंतर अभिषेक शर्मा आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवही आऊट झाला. सूर्याने 8 धावा करुन बाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे टीम इंडियाने पावरप्लेमध्येच 3 विकेट्स गमावल्या.

संजू सॅमसन दुसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर कॅच आऊट झाला. बांगलादेशकडून तास्किन अहमदने दुसरी ओव्हर टाकली. या दुसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर संजूने फटका मारला. मात्र संजूने मारलेला शॉट थेट कॅप्टन नजमुल शांतोच्या दिशेने गेले. नजमुलने अचूकपणे हा कॅच घेतला आणि टीम इंडियाने पहिली विकेट गमावली. संजूने 7 बॉलमध्ये 2 फोरसह 10 धावा केल्या. त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्माने मैदानाबाहेरचा धरला.

टीम इंडियाच्या डावातील तिसरी ओव्हर हसन साकीब टाकायला आला. साकीबच्या या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर अभिषेकने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात बॉल अभिषेकच्या बॅटचा कट घेऊन स्टंपला लागला. अभिषेक अशाप्रकारे आऊट झाला. अभिषेकने 11 चेंडूत 3 चौकारांसह 15 धावा केल्या. संजू आणि अभिषेक या दोघांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यानंतर दोघांना टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून देण्यात यश आलं नाही. अभिषेक आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 2 आऊट 25 असा झाला आहे. त्यानंतर कॅप्टन सूर्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र सूर्याही 8 धावा करुन बाद झाला.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन: नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.