Marathi News Live Updates: सोमवारपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता
Saam TV October 09, 2024 09:45 PM
२०१९ च्या भरतीतील अतिरिक्त यादीवरील, १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेत सामावून घेणार - अध्यक्ष, भरत गोगावले

सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार आहे. अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली.

सन २०१९ च्या भरतीमध्ये निवड झाल्यापैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरती मधील प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया महामंडळात सुरू करण्यात येत आहे. तसेच, प्रतीक्षा यादीवरील उर्वरित सर्व ७२१ उमेदवारांना आवश्यकते प्रमाणे व रिक्त जागेनुसार रा.प.सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवारपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता, मंगलप्रभात लोढा यांचे संकेत

आचारसंहिता सोमवारपर्यंत लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आचारसंहितेपूर्वी सर्व फाईल्स निकाली काढण्याचा आमचा मानस आहे. लोकांनी त्यांचे काही प्रश्न असतील, तर ते तात्काळ मांडावेत. लोकांचे प्रश्न मार्गी लावत झिरो पेंडन्सी फाईल ठेवण्याचा आमच्या विभागाचा प्रयत्न आहे, असे लोढा म्हणाले.

लाडक्या बहिणी पाठोपाठ लाडक्या भावाला ही मिळणार पहिला हफ्ता

राज्यातील ४६ हजार विद्यार्थ्यांना मिळणार विद्यावेतनाचा पहिला हफ्ता. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती.

ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी सरकार शंभर टक्के तत्पर: देवेंद्र फडणवीस

वेगवेगळ्या प्रकारच्या साडेतीनशे जातींमध्ये असलेला हा समाज राज्याच्या विकासाच्या यात्रेमध्ये जेवढा वाटा मिळाला पाहिजे समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे तेवढं दिलं जात नाही. त्यामुळे आमच्या सरकार येताच ओबीसी मंत्रालय तयार करून त्याला अधिकारी मंत्री अनेक वेगवेगळ्या योजना त्या माध्यमातून राबवायला सुरुवात केली. ओबीसींसाठी मोदी आवास योजनेची घोषणा केली. यातून 3 लाख घर झाली. उर्वरित 3 लक्ष घरांना निधी द्यायला सुरुवात केली. आता ओबीसी साठी आतापर्यंत सर्वाधिक जास्त जीआर 44 जीआर मी काढल्याच देवेंद्र फडणवीस सांगितलं.

साडेतीन लाखांची लाच स्वीकारताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अटक

साडेतीन लाखांची लाच स्वीकारताना नवी मुंबईतील एन आर आय, सागरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई युनिटने ही कारवाई केलीये.

सत्यशील शेरकर लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

सत्यशील शेरकर लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे. जुन्नरमधून सत्यशील शेरकर इच्छुक उमेदवार आहेत. शेरकर सध्या काँग्रेसमध्ये आहेत. मात्र जुन्नरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. अतुल बेनके यांच्या विरोधात सत्यशील शेरकर यांचे आव्हान असणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोष्ट करून शिवीगाळ केल्या प्रकरणी अज्ञात फेसबुक चालवणाऱ्यावर जिंतूर पोलिसात विविध कलमानुसार काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला

कोल्हापुरात महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कागल विधानसभा मतदारसंघात पोस्टरबाजी

संजय मंडलिक गटाकडून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पोस्टरबाजी

पोस्टरवर हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्याही नावाचा उल्लेख करत विचारले सवाल

काय काय केलं तुम्ही हे विसरणार नाही आम्ही असं म्हणत दिला कट्टर मंडलिक प्रेमींनी पोस्टरद्वारे इशारा

कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीत रंगलेल्या पोस्टरबाजीचे जिल्हाभर चर्चा

लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांचा पराभव केल्याचे खापर हसन मुश्रीफ यांच्यावर पोस्टरच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच घंटानाद आणि रास्ता रोको आंदोलन

पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं असून सरकार बदला सरकार वाचवा अशा घोषणा यावेळी देण्यात आली मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या बाबतीत सरकारने निष्काळजीपणा दाखवला असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला आहे.. नीट परीक्षा परीक्षेत घोटाळा झाला त्याची चौकशी करण्यात यावी. अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे पुण्यातील गुडलक चौकात हे रास्ता रोकोआंदोलन करण्यात आलं..

आरपीआय सचिन खरात महायुतीची साथ सोडून महाविकास आघाडीबरोबर जाणार Mumbai News: गोरेगावमध्ये ऑइलच्या टँकरला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात ऑइलच्या टँकरला मोठी आग

सुदैवाने जीवितहानी नाही

दुपारी साडेबाराच्या सुमारा घडली घटना

प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेट समोरून जाताना टँकरला आग लागली

Palghar News: पालघरमध्ये मनसेचा काँग्रेसला झटका, सचिन शिंगडांनी घेतली राज ठाकरेंची भेट

पालघरमध्ये मनसेचा काँग्रेसला झटका.

काँग्रेसचे माजी दिवंगत खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा आणि काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी नरेश कोरडा यांनी राज ठाकरेंची घेतली भेट

13 तारखेला सचिन शिंगडा आणि नरेश कोरडा मनसेत पक्षप्रवेश करणार .

Nashik News: छगन भुजबळांनी समीर भुजबळांना नांदगाव मनमाड मतदार संघासाठी दिल्या शुभेच्छा

छगन भुजबळांच समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे ट्वीट

वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना नांदगाव मनमाड मतदार संघासाठी दिल्या शुभेच्छा

नांदगाव मनमाड मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेचे सुहास कांदे आहेत आमदार

नांदगाव मनमाड मतदारसंघात उमेदवारीसाठी समीर भुजबळांची तयारी

समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाचे सर्वच कार्यक्रम नाशिक आणि येवला ऐवजी नांदगाव मध्ये

समीर भुजबळ यांनी नांदगाव मधून उमेदवारीवर दावा केल्याने नांदगाव मनमाड मतदार संघात शिंदे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट आमने सामने येणार

Pune News: पुण्यातील कोथरूड स्टॅन्डसमोर तरुणीला डंपरने चिरडले

पुण्यातील कोथरूड स्टॅन्ड समोर तरुणीला डंपरने उडवले

रस्ता क्रॉस करत असताना तरुणीला डंपरने दिली धडक

डोक्यावरून मिक्सरचे चाक गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू

घटनास्थळी पोलिस दाखल

Pune News: पुण्यात ⁠राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

पुण्यात ⁠राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

⁠आज पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार

निसर्ग मंगल कार्यालयात होत आहेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचे निसर्ग कार्यालयात मोठी गर्दी

Pune News: शिवाजीनगर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून सात उमेदवार इच्छुक

पुणे शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सात उमेदवार इच्छुक.

सात उमेदवारांनी आज दिली शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखत.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ जागा वाटपात काँग्रेसकडे.

2019 मध्ये काँग्रेसने या ठिकाणावरून निवडणूक लढवली होती.

तर वडगाव शेरी मधून माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिली मुलाखत .

बापूसाहेब पठारे यांनी नुकताच भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस.

Mumbai News: मंत्रालयात नोकरीच्या नावाखाली लाखों रुपयांची फसवणूक, दोघांना अटक

मंत्रालयात नोकरीच्या नावाखाली लाखों रुपयांची फसवणूक.

लिपिक पदाचे बोगस नियुक्ती पत्र देऊन चार लाख वीस हजार रूपये घेतले.

या प्रकरणी एका दांपत्यास भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे.

सागर कासारे, प्रिती कासारे असे या आरोपींचे नावे आहेत.

प्रिती कासारे हे बोरिवली मध्ये इव्हेंट मॅनेजमेंटच काम करतात.

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक

या बैठकीत सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्याची शक्यता आहे

केंद्र सरकार दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महागाई भत्यात ३ ते ४ टक्के वाढ करू शकते

सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ५० टक्के महागाई भत्ता मिळतो

Rahul Gandhi News

राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करा, या संदर्भात भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी

या याचिकेत गृहमंत्रालयाला राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे

सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या मते राहुल गांधी यांनी इग्लंडचं नागरिकत्व स्वीकारले होते त्यामुळं त्यांचे नागरिकत्व रद्द करावं

२६ सप्टेंबरला पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणात अलहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने आम्ही या प्रकरणात सुनावणी करू शकत नाही

त्यानंतर न्यायालयाने गृहमंत्रालयाकडे या केसंच स्टेटस काय आहे याची माहिती देण्यास सांगितलं होतं

त्यानंतर आज सुनावणी होणार

Navi Mumbai : नवी मुंबई पोलीस दलातील 5 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Navi Mumbai : गॅस सिलींडरची डिलीव्हरी करणाऱ्या टेम्पो चालकाला दमदाटी करुन त्याच्याकडुन 3 हजार रुपये उकळणे नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडलेय. स्वफ्निल देवरे, विशाल दखणे आणि सचिन बोरकर अशी या तीन पोलिसांची नावे असून सदर प्रकरणात या तिघांवर नेरुळ पोलीस ठाण्यात खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली

Mumbai Air quality : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली

Mumbai Air quality : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 238वर पोहचलाय. वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत गेली आहे.

Pune News : पुणे महापालिकेतील १८ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांची दिवाळी गोड होणार

पुणे महापालिकेतील १८ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांची दिवाळी गोड होणार

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळीचा बोनस

त्यांना दिवाळीपूर्वी ८.३३ टक्के बोनस त्याचप्रमाणे २३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होणार

वित्त व लेखा विभागाने यासंदर्भात काढले परिपत्रक

यासाठी अर्थसंकल्पात सुमारे १२५ कोटी रुपयांची तरतूद

लेखा व वित्त विभागाने काढलेल्या परिपत्रकात १८ ऑक्टोबर पर्यंत सर्व बिले तपासून घेण्याचे विभाग प्रमुखांना देण्यात आले आदेश

Shiv Sena : शिवसेनेची मुंबईत आज दसरा मेळावा आढावा बैठक

शिवसेनेची मुंबईत आज दसरा मेळावा आढावा बैठक होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे बैठक घेणार आहेत.

मुंबईत सर्वच 36 विधानसभा मतदार संघांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा बैठकांचा धडाका सुरु झालाय.

मुंबईतील दसरा मेळाव्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. येत्या शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे. मेळाव्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

पुण्यातील कसबा विधानसभेसाठी भाजपमध्ये चढाओढ

अक्षय बडवे, पुणे साम प्रतिनिधी

पुण्यातील कसबा विधानसभेसाठी भाजपमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.

पक्षाचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासाठी भाजपचे काही पदाधिकारी आक्रमक

कसब्यातून धीरज घाटे यांनाच उमेदवारी द्या, शहरातील काही पदाधिकाऱ्यांची थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी

पुणे शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जाऊन ही मागणी केली

पुणे शहरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत जाऊन भेट

पोटनिवडणुकीत हातातून निसटलेला आपला पारंपरिक मतदारसंघ भाजपा पुन्हा एकदा खेचून आणू शकतो, पदाधिकाऱ्यांचा बावनकुळे यांना विश्वास

हेमंत रासने सुद्धा कसबा विधानसभा मधून इच्छुक आहेत

Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात अटक टाळण्यासाठी नितेश राणे उच्च न्यायालयात

माझगाव कोर्टाने ऑगस्ट महिन्यात रणेंविरोधात बजावला होता अजामीनपात्र वॉरंट

वॉरंट रद्द करण्यासाठी राणे मुंबई उच्च न्यायालयात

samruddhi mahamarg : समृद्धी महामार्गावर कंटेनर आणि लक्झरी ट्रॅव्हलचा अपघात

समृद्धी महामार्गावर कंटेनर आणि लक्झरी ट्रॅव्हलचा अपघात झालाय. एका जणाला गंभीर दुखापत झाली आहे, तर 16 जण किरकोळ जखमी आहेत. वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर 496.6 जवळ अपघात झालाय.

लक्झरी ट्रॅव्हल्स मुंबईच्या दिशेने जात असताना समोर जात असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला.

Maharashtra Politics : महायुतीत जागावाटप करताना भाजप १५५ पेक्षा जास्त जागांबद्दल ठाम

Maharashtra News : मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या त्यांचे आमदार असलेल्या जागांच्या व्यतिरिक्त जास्त जागांच्या मगणीबद्दल भाजपकडून संबंधीत मतदारसंघात जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार कोणते? याबाबात विचारणा केली जाणार असल्याची भाजप मधील सुत्रांनी माहिती दिली. "सीटिंग आमदार असलेल्या जागा व्यतिरिक्त जागा हवी असल्यास जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार सांगा मगच मतदारसंघ घ्या" अशी विचारणा करण्याची भाजपची स्ट्रेटेजी आहे. महायुतीत भाजप १५५ पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाला मिळणार ६० पेक्षा जास्त जागा...

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.