Latest Maharashtra News Updates : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
esakal October 16, 2024 03:45 PM
Indigo Airlines LIVE : लखनौला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे जयपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

जयपूर, राजस्थान : दम्मम (सौदी अरेबिया) येथून लखनौला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे जयपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याचा दावा करणारा धमकीचा मेल आला होता. मात्र, तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

Ichalkaranji Bar Association Election LIVE : इचलकरंजी बार असोसिएशनसाठी २४ ला मतदान

इचलकरंजी : दि. इचलकरंजी बार असोसिएशनचा ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२६ या दोन वर्षांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये मतदान २४ ऑक्टोबरला होणार असून, त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे. दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव खजिनदार व सदस्यपदासाठी ही निवडणूक होणार आहे. तीन महिन्यांपूर्वी दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला होता.

Weather Update LIVE : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात काही ठिकाणी ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे, तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. दुसरीकडे आजही महाराष्ट्रामध्ये अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

Maharashtra Vidhansabha Election LIVE : महाराष्ट्रात एकाच टप्प्यात रणधुमाळी, 20 नोव्हेंबरला होणार मतदान

Latest Marathi Live Updates 16 October 2024 : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाला. राज्यात एकाच टप्प्यात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसेच केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रियांका गांधी-वद्रा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील दोन-तीन दिवस हवामान विभागाने राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.