Moreshwar Bhondve : चिंचवड मतदारसंघ ठाकरे गटाकडे, मोरेश्वर भोंडवेंच्या पक्षप्रवेशाने समीकरण बदलले?
Sarkarnama October 19, 2024 12:45 PM

Moreshwar Bhondve News : चिंचवड मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाकडे असेल हे अजून निश्चित झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे हा मतदारसंघ असण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने चिंचवडची जागा शिवसेनेकडे (यूबीटी) जाणार असल्याची शक्यता आहे.

मोरेश्वर भोंडवे हे चिंचवड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याच इच्छुक होते. उमेदवारीसाठीच त्यांनी शिवसेनेत (यूबीटी) प्रवेश केल्याची चर्चा आहे. भोंडवेंच्या पक्षप्रवेशामुळे चिंचवड मतदारसंघ हा ठाकरे गटाकडे असल्याचे निश्चित मानले जात आहे.

मोरेश्वर भोंडवे हे चे दोन वेळा नगरसेवक होते. तसेच राष्ट्रवादी (अजित पवार गट) शहर कार्याध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावा म्हणून प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी अजित पवार यांना केला होती. मात्र, ज्या पक्षाचा विद्यमान आमदार ती जागा त्या पक्षाला या सुत्रानुसार चिंचवडची जागा भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित झाले होते.

2014 मध्ये अपक्ष म्हणून भोंडवे हे चिंचवड विधानसभेची अपक्ष निवडणूक लढविली होती. यंदा देखील त्यांची निवडणूक लढण्याची तयारी होती म्हणून त्यांनी शरद पवारांची देखील भेट घेतली होती.

भाजपकडून शंकर जगताप उमेदवार?

च्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. "माझ्या ऐवजी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना चिंचवडमधून उमेदवारी देण्यात द्यावी," अशी मागणी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.अश्विनी जगताप यांच्या माघारीमुळे शंकर जगताप यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.