आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 ऑक्टोबर 2024
esakal October 19, 2024 12:45 PM

पंचांग -

शनिवार : आश्विन कृष्ण २, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.०७, चंद्रोदय सायंकाळी ७.३९, चंद्रास्त सकाळी ८.१५, भारतीय सौर आश्विन २७ शके १९४६.

दिनविशेष -

  • २०१० - संतूरवादक पं. सतीश व्यास यांना अकरावा ‘कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मान’ जाहीर.

  • २०१४ - जोहोर करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय कुमारांनी आक्रमक खेळाचे सुरेख प्रात्यक्षिक दाखवत स्पर्धेचे विजेतेपद राखले.

  • २०१५ - भारताचा टेनिसपटू युकी भांब्री याने एकेरीच्या जागतिक क्रमवारीत ९९ वा क्रमांक मिळविला. टॉप हंड्रेडमध्ये स्थान मिळविलेला तो एकूण आठवा भारतीय आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.