मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची शपथ घेतो, लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही : अजित पवार
Marathi October 19, 2024 10:24 PM

लाडकी बहिन योजनेवर अजित पवार जोपर्यंत मी इथं आहे, तोपर्यंत लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Scheme) बंद करण्याचे विरोधकांचे स्वप्न कधीच यशस्वी होणार नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे महाराष्ट्रातील महिलांचे लाडकी बहीण योजनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. महायुती सरकारच्या माझी लाडकी बहिण योजनेच्या यशाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, या योजनेने महिलांना स्वावलंबी बनवून सक्षम केले आहे. या योजनेमुळे लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यास मदत झाली आहे, असे अजित पवार म्हणाले.  आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महिलांनी महायुतीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो की, ही योजना बंद होऊ देणार नाही असेही अजित पवार म्हणाले.

अडीच कोटींहून अधिक महिलांना पाच महिन्यांचा 7500 रुपयांचा हप्ता मिळाला

आधी या योजनेच्या व्यवहार्यतेवर आणि नंतर त्याच्या अंमलबजावणीवर विरोधकांनी सातत्याने विरोध केला होता. ही योजना अंमलात आल्यानंतर आता पैसे येत असले तरी निवडणुकीनंतर ही योजना बंद केली जाईल, असे विरोधक पसरवताय. लाडकी बहीण योजनेबद्दल सांगताना अजितदादा म्हणाले की, महिलांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांचा वापर केला आहे. दुसऱ्या एका घटनेत एका महिलेने दोन महिन्यांचा हप्ता आणि स्वत:च्या बचतीतून शिवणयंत्र विकत घेतले आहे. राज्यभरात अशा अनेक महिलांच्या यशोगाथा समोर येत असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. अडीच कोटींहून अधिक महिलांना पाच महिन्यांचा एकूण 7500 रुपयांचा हप्ता मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो की ही योजना बंद होऊ देणार नाही

राज्याचे अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. यासाठी 46 हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार महिलांना 1500 रुपये देते. विरोधी पक्षातील अनेकांनी ही योजना बंद केल्याचा दावा केला असला तरी तुम्ही माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो. मी ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही, असे अजित पवार म्हणाले. निवडणुकीनंतर महायुती सरकारकडून योजनेच्या निधीत वाढ करण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. महिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानत अजित पवार म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील माझ्या बहिणी आगामी निवडणुकीत ही योजना संपवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देतील.

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar: लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक गडबडलेत; महायुतीचं रिपोर्ट कार्ड मांडत अजित पवारांचं टीकास्त्र

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.