IND vs PAK : प्रभसिमरन-अभिषेकची आक्रमक सुरुवात, तिलकची फटकेबाजी, पाकिस्तानसमोर 184 रन्सचं टार्गेट
GH News October 20, 2024 12:08 AM

एमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 183 धावा केल्या. टीम इंडियाकडून 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. त्यापैकी पहिल्या चौघांनी धुव्वाधार फटकेबाजी पाकिस्तानच्या गोलंदाजांना झोडपून काढलं. टीम इंडियासाठी कॅप्टन तिलक वर्मा याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर ओपनिंग जोडी प्रभसिमरन सिंह आणि अभिषेक शर्मा या दोघांनी 30+ धावा केल्या. तसेच नेहल वढेरा याने 25 आणि रमनदीप सिंह याने 17 धावांचं योगदान दिलं. तर चौघांना एकेरी धावा केल्या. मात्र अंशुल कंबोज याला भोपळा फोडता आला नाही.

टीम इंडियाची बॅटिंग

अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंह या सलामी जोडीने टीम इंडियाला अप्रतिम सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 6.1 ओव्हरमध्ये 68 धावा जोडल्या. त्यानंतर अभिषेक 22 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 5 फोरसह 35 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर प्रभसिमर 36 धावावंर बाद झाला. सलामी जोडी माघारी परतल्यानंतर कॅप्टन तिलक आणि नेहल वढेरा या दोघांनी टीम इंडियाच्या बॅटिंगची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. या दोघांनी संधी मिळेल तशी फटकेबाजी करत स्कोअरकार्ड हलता ठेवला.

तिलक वर्माने 35 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 44 रन्स केल्या. तर नेहल वढेराने 25 धावा केल्या. रमनदीप सिंहने 17 धावांचं योगदान दिलं. आयुष बदोनी 2 आणि निशांत सिंधू याने 6 धावा केल्या. अंशुल कंबोज आला तसाच गेला. तर राहुल चाहर 4आणि रसीख सलाम 6 अशा धावा करुन ही जोडी नाबाद परतली. तर पाकिस्तानकडून सुफियान मुकीम याने 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद इमरान, झमान खान, अरफात मिन्हास आणि कासिम अक्रम या चौघांनी 1-1 विकेट घेतली.

इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : तिलक वर्मा (कॅप्टन), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), रमणदीप सिंग, अंशुल कंबोज, आयुष बदोनी, नेहल वढेरा, निशांत सिंधू, राहुल चहर, रसिक दार सलाम आणि वैभव अरोरा.

पाकिस्तान ए प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद हरीस (कॅप्टन आणि विकेटकीपर), यासिर खान, अराफत मिन्हास, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, हसीबुल्ला खान, मेहरान मुमताज, अब्बास आफ्रिदी, शाहनवाज दहनी, अहमद दानियाल, मोहम्मद इम्रान आणि जमान खान.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.