IND vs NZ : इंडिया-न्यूझीलंड वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, या खेळाडूंना संधी
GH News October 22, 2024 08:16 PM

न्यूझीलंड क्रिकेट टीमने बंगळुरुत टीम इंडियावर 8 विकेट्सने मात केली. न्यूझीलंडने यासह भारतात 36 वर्षांनी कसोटी विजय मिळवला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड वूमन्स टीमने दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष सुरु असतानाच न्यूझीलंड वूमन्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंड टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंड-टीम इंडिया यांच्यात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियानंतर न्यूझीलंडने खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. न्यूझीलंडने या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडने या 15 मध्ये बहुतांश वर्ल्ड कप विजयी संघातील खेळाडूंचाच समावेश केला आहे. सोफी डिवाईन हीच न्यूझीलंडचं या मालिकेत नेतृत्व करणार आहे. तर हरमनप्रीत कौर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

या मालिकेतील तिन्ही सामने हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहेत. ही मालिका वनडे वूमन्स चॅम्पियनशीप अंतर्गत खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड आता पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. न्यूझीलंड या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या वनडे वूमन्स चॅम्पियनशीप स्पर्धेतील अव्वल 5 संघ आणि यजमान टीम इंडिया एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहेत.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 24 ऑक्टोबर, दुपारी दीड वाजता

दुसरा सामना, 27 ऑक्टोबर, दुपारी दीड वाजता

तिसरा सामना, 29 ऑक्टोबर, दुपारी दीड वाजता

वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड वूमन्स टीम : सोफी डिवाइन (कॅप्टन), सजी बेट्स, ईडन कार्सन, लॉरेन डाउन, इजी गेज (विकेटकीपर), मैडी ग्रीन, ब्रूक हॉलिडे, पॉली इंग्लिस (विकेटकीपर), फ्रॅन जोनास, जेस केर, अमेलिया केर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोव आणि ली ताहुहु.

न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वूमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृति मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, डी हेमलता, दीप्ति शर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), सायली सातघरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, तेजल हसबनीस, साइमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयांका पाटील.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.