5 मिनिटात असा लावा साडीला फॉल, डिझाईनर साड्यांची विशेष घ्या काळजी
Times Now Marathi October 22, 2024 11:45 PM

Tips to Stitch Saree Fall: दिवाळी म्हंटली की नवनवीन वस्तु आणि पोषाखांची खरेदी केली जाते. महिला वर्ग देखील या सणाच्या दिवशी आपल्या पतीकडून आणि भावाकडून नवीन साडी घेण्याचा हट्ट करतात. तसेच लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या महत्वाच्या दिवशी नव्या साडीची घडी मोडतात. तत्पूर्वी या साड्यांची खालची किनार खराब होऊ नये म्हणून फॉल लावले जाते. त्याचप्रमाणे पदराच्या बाजूचे धागे जर निघत असतील तर बिडिंगसुद्धा करावे लागते. आजकाल बाजारात जिथे साडी विकत घेतली जाते तिथे या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, पण जी साडी भेटवस्तुच्या स्वरूपात स्वीकारली जाते, त्या साडीला रेडिमेड फॉल लावलेला नसतो, जो नंतर लावावा लागतो. तुम्ही देखील यंदाच्या दिवाळीला नव्या साडीची घडी मोडणार असाल, तर नव्या रेशमी साडीला फॉल लावताना कोणती काळजी घ्यायला हवी याबद्दल माहिती घेऊया.

अनेकदा नव्या साडीला चुकीच्या पद्धतिने फॉल लावल्यास ती खेचल्यासारखी दिसून येते, तसेच अशी साडी परिधान केल्यावर निऱ्याच्या बाजूला चुरगळलेली किंवा बोळा झालेली दिसते. त्यात जर ती डिझाईनर साडी असेल तर चुकीच्या फॉलमुळे त्याची शोभा निघून जाते. त्यामुळे नव्या साडीला फॉल लावताना केवळ टेलरवर निर्भर न राहता तुम्ही स्वतः त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

नव्या साडीला फॉल लावताना कोणती काळजी घ्यायला हवी?
तुम्ही जर स्वतः नव्या साडीला फॉल लावणार असाल किंवा कोणाकडून लावून घेणार असाल, साडी खराब होऊ नये किंवा चुरगळू नये म्हणजे कोणती काळजी घेणे गरजेचे आहे, याबद्दल जाणून घेऊया.

सूती फॉलची निवड करा


साडी फॉल खरेदी करताना सूती फॉलच निवडा. कॉटन फॅब्रिक फॉल सर्व प्रकारच्या साड्यांवर लावता येते आणि त्यामुळे साडीचे दीर्घकाळ संरक्षण होते.साडी खालून मळत नाही आणि तिच्यवरील नक्षीकाम देखील अबाधित राहते.

फॉल धुवून घ्या
साडीला फॉल लावण्यापूर्वी सर्वात आधी तो चांगला धुवून वाळवायला हवा, कारण फॉल धुतल्यानंतर कॉटनचे कापड थोडेसे आकुंचन पावते. म्हणून, साडी प्रथम धुवा जेणेकरून साडीची काठ परिपूर्ण राहील.

फॉलचा आकार


तुम्हाला साडीचा 10 इंच तळापासून सोडून फॉल लावायला सुरुवात करावी लागेल. साडीच्या फॉलचा आकार फक्त अडीच मीटर असावा.

गोटा किंवा बॉर्डर साडीवर फॉल कसा लावावा?
जर साडीला तळाशी गोटा पट्टी किंवा बॉर्डर असेल तर ते साडीतून काढून टाकावे लागेल, आणि नंतर फॉल लावावे लागेल. असे केल्यानंतर तुम्ही पुन्हा उसवलेली गोटा पट्टी किंवा बॉर्डर शिवून घेऊ शकता.

लहान टाके घाला


फॉल करताना, साडीखाली पाठ किंवा काहीतरी कठीण गोष्ट ठेवा ज्यामुळे साडी फॉल लावताना हातातून निसटणार नाही. आणि टाके देखील वाकडे तिकडे पडणार नाही. फॉल लावताना नेहमी छोटे टाके घाला, तसेच साडीला जुळणारा मॅचिंग धागा निवडा. यामुळे साडीवर पडलेले टाके दिसणार नाहीत.

साडीच्या आतल्या बाजूने फॉल लावा
फॉल नेहमी साडीच्या आतील बाजूस ठेवावा. ती बाहेरून लावल्यास ती साडीची बॉर्डर किंवा डिझाइन झाकून टाकते, ज्यामुळे साडीचे सौंदर्य कमी होऊ शकते.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.