छत्रपती संभाजीनगर उल्लेख करायला लाज वाटली का? शिवसेनेचा भाजपला सवाल
Marathi October 23, 2024 12:24 AM

भाजपने रविवारी महाराष्ट्र विधानसभेसाठी 90 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत त्यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचा उमेदवार देखील जाहीर केला. मात्र या यादीत त्यांनी छत्रपती संभाजीनगर पूर्व असा मतदारसंघाचा उल्लेख करण्याऐवजी औरंगाबाद पूर्व असा उल्लेख केला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाने भाजपला फटकारले आहे. ”भाजपला छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करायला लाज वाटते का?”, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

भाजपने रविवारी जाहीर केलेल्या यादीत छत्रपती संभाजीनगरमधून अतुल सावे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या यादीत त्यांनी अतुल सावे यांच्या नावासमोर औरंगाबाद पूर्व असा उल्लेख केला आहे. त्यावरून शिवसेनेने एक पोस्ट शेअर करत भाजपला फटकारले आहे. ”भाजपला आपल्या पहिल्या उमेदवारीच्या यादीत छत्रपती संभाजी नगर हा उल्लेख करायला लाज वाटली का? असा सवाल या पोस्टमधून केला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.