Shikhar Dhawan चा 'लड्डू मुत्त्या' ट्रेंडवरील Video Viral, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
esakal October 23, 2024 05:45 AM

Shikhar Dhawan Reel on Laddu Muttya Baba: भारतीय माजी क्रिकेटपटू शिखर धवन सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. शिखर धनवच्या इंस्टाग्राम हॅंडलवर नेहमीच आपल्याला विनोदी रिल्स पहायला मिळतात. यावेळीही गब्बरने सोशल मीडियावर एक विनोदी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ काहीच मिनीटांमध्ये व्हायरल झाला व सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

सोशल मीडियावर सध्या 'लड्डू मुत्त्या' बाबाचा व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे. अनेकजण अशा प्रकारच्या विनोदी व्हिडीओ बनवून 'लड्डू मुत्त्या' बाबाला ट्रोल करत आहेत. त्यात आता भारतीय माजी खेळाडू शिखर धनवदेखील या ट्रेंडचा भाग बनला आहे. ज्यामध्ये शिखर एका खुर्चीवर बसला आहे व त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला खुर्चीसह उचलून धरले आहे. नंतर शिखर चालू पंखा हाताने थांबवतो व पंख्यावरील धुळ त्याच्या सहकाऱ्यांच्या कपाळाला लावताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. शिखरच्या या विनोदी व्हिडीओला प्रेक्षकांतर्फे चांगली पसंती मिळत आहे.

कोण आहे 'लड्डू मुत्त्या' बाबा ?

सोशल मीडियावर चर्चेत असणारा हा लड्डू मुत्त्या बाबा कर्नाटकातील बागलकोट येथील आहे. हा बाबा चालू पंखा हाताने थांबवतो व पंख्याची धूळ भक्तांच्या कपाळावर लावून त्यांना आशिर्वाद देतो. तर त्याच पंख्याने त्याने केळीही कापून दाखवली होती. हा प्रकार त्याच्या भक्तांना चमत्कार वाटला व त्याला प्रसिद्धी मिळाली. पण, सोशल मीडियावरील या भोंदू बाबाचा डॉ. पुनीत कुमार यांच्याकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. डॉ. पुनीत कुमार यांनी बाबाच्या या चमत्काराबद्दल तांत्रिक कारण सोशल मीडियाद्वारे सर्वांसमोर मांडले. त्यामुळे लड्डू मुत्त्या बाबाला नेटकऱ्यांद्वारे ट्रोल केले जात आहे.

शिखर धवनची कारकिर्द

शिखरने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली.ऑक्टोबर २०१० मध्ये विशाखापट्टणम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे सामन्यात शिखरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर १० डिसेंबर २०२२ रोजी बांगलादेशविरूद्ध त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दितील शेवटचा सामना खेळला. शिखरने भारतासाठी आत्तापर्यंत एकूण २६९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०८६७ धावा केल्या आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.