युवा संगीत सभेत गायन-वादन सादर
esakal October 23, 2024 05:45 AM

पुणे, ता. २२ : युवा कलाकारांना व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलेच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात व्हावी, या हेतूने मएसो कलावर्धिनी व स्वराधार फाउंडेशनच्या वतीने सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेत ऊर्जा युवा संगीत सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी पं. नयन घोष यांचा शिष्य अनिरुद्ध पंडित याचे एकल तबलावादन व कल्याणी देशपांडे यांचे सतारवादन झाले. पं. सुहास व्यास यांचे शिष्य केदार केळकर यांच्या अल्हैय बिलावल रागाच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या सर्व कलाकारांना पार्थ ताराबादकर, शंतनू देशमुख व कल्पतरू ठाकरे यांनी साथसंगत केली. यावेळी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, अभिनेते राहुल सोलापूरकर, मएसोच्या आनंदी पाटील, स्वराधारचे संचालक नील दीक्षित, डॉ. दिलीप शेठ व गोविंद कुलकर्णी उपस्थित होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.