Bhool Bhulaiyaa 3 BO Collection Day 5: बॉक्स ऑफिसवर (Box Office) कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) जादू पाहायला मिळत आहे. कार्तिकनं साकारलेला रुह बाबा लोकांना भलताच आवडला आहे. दिवाळीपासूनच रुह बाबानं प्रेक्षकांना जणू आपली भूरळ घातली आहे. भूल भुलैया 3 बॉक्स ऑफिसवर गाजत असून दररोज कमाईचे नवे विक्रम रचत आहे.
कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 ची बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेनसोबत टक्कर झाली. यामध्ये सिंघम अगेनच्या तगड्या स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन भारी पडला. वीक डेजमध्येही कार्तिकचा भूल भुलैया 3 दोन आकड्यांत कमाई करत आहे. हा चित्रपट दररोज कलेक्शनच्या बाबतीत अजय देवगणच्या सिंघम अगेनला टक्कर देत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर पाचव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. त्यानंतर आता हा चित्रपट 150 कोटींच्या क्लबपासून दूर नाही, असं म्हणता येईल. दरम्यान, भूल भुलैया 3 बद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं पहिल्या दिवसापासून चांगलं कलेक्शन केलं आहे.
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, भूल भुलैया 3 नं पाचव्या दिवशी सुमारे 13 कोटी कमावले आहेत. हे अजूनही सुरुवातीच्या ट्रेंडनुसार आहे. कलेक्शनचा खरा डेटा समोर येईल, तेव्हा तो त्यापेक्षा कितीतरी अधिक असेल. पाचव्या दिवसाच्या कलेक्शननंतर चित्रपटाची एकूण कमाई 137 कोटी झाली आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 35.5 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 37 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 33.5 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून दूर नाही.
भूल भुलैया 3 बद्दल बोलायचं झालं तर, अनीस बज्मी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तृप्तीनं चित्रपटाला ग्लॅमरचा टच दिला आहे. कार्तिक आणि विद्याच्या अभिनयाचं कौतुक करताना लोक थकत नाहीत.
'भूल भुलैया 3' कार्तिक आर्यनच्या करिअरची सर्वात मोठी फिल्म बनली आहे. फिल्मनं पहिल्याच दिवशी 35 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. तसेच, त्याच्या करिअरची सर्वात मोठी ओपनर फिल्म ठरली, 2022 मध्ये आलेली 'भूल भुलैया 2', जिनं 14 कोटींच्या आसपास कमाई केली होती. याव्यतिरिक्त हा चित्रपट विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्या करिअरची सर्वात मोठी ओपनिंग देणारी फिल्म ठरली आहे.