Must Watch Series On NETFLIX: Netflix वर Thriller Shows ची एक लांबलचक मोठी लिस्ट आहे. पण काही शो असे आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. जर तुम्ही 'मनी हाईस्ट' आणि 'स्क्विड गेम' सारख्या शोचे फॅन असाल, तर येत्या विकेंडला पाहण्यासाठी 8 थ्रीलर शोजची लिस्ट सेव्ह करुन ठेवा.
जर तुम्ही मनी हाईस्ट आणि स्क्विड गेमसारख्या थ्रीलर वेब सीरिजचे फॅन असाल, तर नेटफ्लिक्सवर तुम्हाला इतरही काही शो मिळू शकतात, जे तुमचा विकेंड उत्तम करण्यासाठी मदत करतील. आज आम्ही तुम्हाला 8 थ्रिलर शोबाबत सांगणार आहोत, जे पाहून तुम्ही मनोरंजनाची उत्तम मेजवानीचा अनुभव घेऊ शकाल.
फ्रान्सच्या मिस्ट्री थ्रिलर 'लुपिन'मध्ये ओमार सीने आपल्या शानदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा शो असाने डियोपची कहाणी आहे, दे मास्टर चोर आर्सेन लुपिनच्या कथेपासून प्रेरित आहे. याची रोमांचक पटकथा आणि सस्पेन्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल... (Still From Web Series)
'एलीट' एक स्पॅनिश टीन ड्रामा सीरिज आहे, जे प्रायमरी स्कूलमध्ये शिकणाऱ्या तीन वर्किंग क्लासच्या विद्यार्थ्यांची कहाणी आहे. या शोमध्ये सामाजिक आणि रोमॅन्टिक इंटरॅक्शन दाखवण्यात आलं आहे, ज्यामुळे हा शो तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला आहे. (Still From Web Series)
'मनी हाइस्ट: कोरिया – जॉइंट इकोनॉमिक एरिया' एक साउथ कोरियन सीरीजहे, जी ऑरिजिनल स्पॅनिश सीरीजवर आधारित आहे. या सीरिजमध्ये एका नव्या अंगानं चोरीची कहाणी दाखवण्यात आली आहे. जिथे एक मास्टरमाईंड आणि त्याच्या ग्रुपचे सदस्य बँक लुटण्याची योजना आखतात. (Still From Web Series)
'ओजार्क' एक अमेरिकी क्राइम ड्रामा आहे, ज्यामध्ये जेसन बेटमॅननं मार्टी बायर्डची भूमिका साकारणार आहे. कथा एका आर्थिक नियोजकाचं अनुसरण करते, जो त्याच्या कुटुंबाला नव्या ठिकाणी हलवतो आणि मेक्सिकन ड्रग कार्टेलसह पैशाची लाँड्रिंग करण्यात गुंततो.(Still From Web Series)
स्पॅनिश ब्लॅक कॉमेडी 'स्काई रोजो' तीन सेक्स वर्कर्सची कहानी आहे, जी आपल्या बॉसपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असते. हा शो फक्त मनोरंजक नाही, तर वेश्याव्यावसायाचं वास्तव जगासमोर मांडणारा आहे. (Still From Web Series)
'द किल पॉइंट' एक अमेरिकन टेलिव्हिजन सीरीज आहे, ही इराकमधून अमेरिकेत परतलेल्या एका यूएस मरीनच्या एका ग्रुपची कहानी आहे. याग्रुपनं एक बँक लुटण्याची योजना आखलेली असते. थरारक कथा आणि जबरदस्त ॲक्शननं हा शो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो (Still From Web Series)
'व्हाइट लाइन्स' एक ब्रिटिश-स्पॅनिश मिस्ट्री थ्रिलर आहे, जी दोन टाईमलाईन्समध्ये चालते. याची कथा जोईच्या आसपास फिरते, जोई तिचा भाऊ एक्सेलच्या रहस्यमयी मृत्यूचं गूढ शोधण्याच्या प्रयत्नात असते. त्यासाठी ती तिच्या जुन्या मित्रांना भेटते. (Still From Web Series)
'हाइस्ट' एक डॉक्यूमेंट्री सीरीज आहे, ज्यामध्ये तीन खऱ्या गुन्हेगारांची कहानी सांगितली आहे. (Still From Web Series)
Prime Video वरच्या 'या' 5 हिंदी कॉमेडी वेब सिरीज पाहिल्यात का? नक्की पाहा, खळखळून हसवतात!