मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने बंडखोरी करणाऱ्या 40 जणांवर कडक कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षांने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांमध्ये श्रीकांत भारतीय यांच्या भावाचा देखील समावेश असून, पक्षाच्या निर्णयामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपमध्ये बंडखोरी केलेल्या चाळीस जणांवर पक्षाची ही कारवाई केली आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर या नेत्यांची पक्षाकडून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देताना पक्षाने काही ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर काही नव्या उमेदवारांची निवड केली होती. मात्र, काहींनी पक्षाच्या आदेशाचे पालन न करता उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला, त्यामुळे पक्षांच्या अडचणी वाढल्याने आता ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी बंडखोरांना स्थानिक पातळीवर जनतेचा आधार असू शकतो. त्यामुळे या 40 बंडखोरांची हकालपट्टी पक्षाच्या यशावर कितपत प्रभाव पाडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षाच्या या निर्णयानंतर महायुतीतील प्रमुख नेते एकजुटीचे आवाहन करत आहेत.
भाजपकडून (महायुतीकडून) अधिकृत उमेदवार देऊन देखील पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केल्यामुळे निवडणुकीच्या निकालांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी बंडखोरीमुळे मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 40 बंडखोरांची हकालपट्टी केल्यानं आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
सावंतवाडी विशाल परब, श्रीगोंदा सुवर्णा पाचपुते, अक्कल कोट सुनील बंडगर, अमरावती जगदीश गुप्ता, साकोली सोमदत्त करंजकर, सोलापूर शहर उत्तर शोभा बनशेट्टी यांच्यासह एकूण 40 जणांवर पक्षाची कारवाई करण्यात आली आहे. बडनेरा येथील तुषार भारतीय, नालासोपाराचे हरिश भगत, मागठाणे येथील गोपाल जव्हेरी, सावंतवाडीतील विशाल परब, श्रीगोंद्यातील सुवर्णा पाचपुते, अक्कलकोटमधील सुनील बंडगर, अमरावतीतील जगदीश गुप्ता आणि साकोलीतील सोमदत्त करंजकर यांच्यासह एकूण 40 जणांवर भाजपकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पक्षांतर्गत बंडखोरी कमी होण्याची शक्यता आहे.
श्रीकांत करले
सोपान पाटील
मयुर कापसे
आश्विन सोनवणे
गजानन महाले
नागेश घोपे
तुषार भारतीय
जगदीश गुप्ता
प्रमोद सिंह गडरेल
सोमदत्त करंजेकर
शंकर मडावी
ब्रिजभूषण पाझारे
वसंत वरजुरकर
राजू गायकवाड
अतेशाम अली
भाविक भगत
नटवरलाल उंतवल
वैशाली मिलिंद देशमुख
मिलिंद उत्तमराव देशमुख
दिलीप वेंकटराव कंदकुर्ते
सुनील साहेबराव मोरे
संजय घोगरे
सतीश जगनाथराव घाटगे
अशोक पांगारकर
सुरेश सोनवणे
एकनाथ जाधव
कुणाल शिवाजी सुर्यवंशी
आकाश साळुंखे
जयश्री गरुड
हरिष भगत
स्नेहा देवेंद्र पाटील
वरुण सदाशिव पाटील
गोपाळ जव्हेरी
धर्मेंद्र गोपीनाथ ठाकूर
दिलीप विठ्ठल भोईर
बाळासाहेब मुरकुटे
शोभा बनशेट्टी
सुनिल बंडगर
सुवर्णा पाचपुते
विशाल प्रभाकर परब