After Sayaji Shinde famous comedian Bhau Kadam will campaign for Ajit Pawar NCP rrp
Marathi November 06, 2024 01:24 PM


मनोरंजन विश्वातील तारे-तारका लाखोंच्या सुपाऱ्या खिशात टाकून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला ग्लॅमरचा तडका देताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ मराठी अभिनेते संयाजी शिंदे यांच्यानंतर आता प्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करताना दिसणार आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून आता प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसणार आहेत. महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतील. विशेष म्हणजे मनोरंजन विश्वातील तारे-तारकाही लाखोंच्या सुपाऱ्या खिशात टाकून या प्रचाराला ग्लॅमरचा तडका देताना दिसणार आहेत. ज्येष्ठ मराठी अभिनेते संयाजी शिंदे यांच्यानंतर आता प्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करताना दिसणार आहे. (After Sayaji Shinde famous comedian Bhau Kadam will campaign for Ajit Pawar NCP)

संयाजी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अशातच “चला हवा येऊ द्या” या विनोदी मालिकेतून घराघरात पोहचलेला विनोदी अभिनेता भाऊ कदम हा देखील आता राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करताना दिसणार आहे. लोकांना खळखळवून हसवण्यात भाऊ कदम तरबेज आहे. त्यामुळे त्याला प्रचार रॅलीत सहभागी करून लोकांपर्यंत पोहचण्याचा अजित पवारांचा प्रयत्न केला. याशिवाय अर्थसंकल्पात अजित पवार यांनी लाडकी बहिण योजना आणली आहे. ही योजना महिलांपर्यंत पोहचली आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजनेसह विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्यभरात भाऊ कदम यांच्या प्रचार रॅलीच आयोजन केले जाणार आहे.

– Advertisement –

हेही वाचा – Sharad pawar : “14 निवडणुका लढल्या, बारामतीकरांनी एकदाही घरी पाठवलं नाही, आता…”, शरद पवारांनी दिले मोठे संकेत

– Advertisement –

विधानसभा निवडणुकीसाठी 25 लाखांहून अधिकची सुपारी

दरम्यान, हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वातील तारे-तारका निवडणुकीच्या प्रचारासाठी लाखोंच्या सुपाऱ्या घेताना दिसतील. लोकसभा निवडणुकीवेळी हिंदीतील कलाकारांची सुपारी 20 लाख रुपये होती, पण आता विधानसभा निवडणुकीत सुपारी 25 लाख रुपयांच्या पुढे गेल्याचे समजते. मध्यस्थांच्या मदतीने हा आकडा कमी-जास्तही केला जात आहे. मात्र अशावेळी कलाकारांना निश्चित केलेल्या मानधनापैकी 50 टक्के रक्कम मध्यस्थ्यांच्या खिशात जाण्याचे प्रकारही आता घडताना दिसतील. विशेष म्हणजे निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने इव्हेंट मॅनेजर्स आणि कलाकारांना सुपाऱ्या मिळवून देणाऱ्यांची चांदी होताना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : माहिम मतदारसंघात नवा ट्वीस्ट, अमित ठाकरेंची बाजू घेणारे शेलार म्हणतात…


Edited By Rohit Patil





Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.