अनिल अंबानींची आणखी एक कंपनी कर्जमुक्त, या शेअरची अप्पर सर्किटला धडक, किंमत फक्त 43 रुपये
ET Marathi November 07, 2024 04:45 PM
मुंबई : उद्योजक अनिल अंबानींचा रिलायन्स समूह कर्जमुक्तीवर भर देत आहे. याचाच एक भाग म्हणून रिलायन्स पॉवरचे युनिट रोजा पॉवर सप्लाय कंपनीने सिंगापूरस्थित कर्ज वितरण संस्था वर्दे पार्टनर्सला 485 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. आता रोजा पॉवर ही कर्जमुक्त कंपनी बनली आहे. दरम्यान, Reliance Power Ltd चा शेअर बुधवारी, 6 नोव्हेंबर रोजी 5 टक्क्यांनी वाढून 43.47 रुपयांवर बंद झाला. 4 ऑक्टोबर 2024 रोजी शेअर 54.25 रुपयांवर गेला. या संदर्भात शेअर अजूनही 52 आठवड्यांच्या उच्च पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शेअरची किंमत 19.36 रुपयांपर्यंत घसरली होती. कंपनीने काय सांगितलेरोजा पॉवरने शून्य-कर्जाचा दर्जा प्राप्त केला आणि शेड्यूलच्या आधी 1,318 कोटी रुपये भरून आपले थकित कर्ज पूर्णपणे फेडले आहे, असे रिलायन्स पॉवरने एका निवेदनात म्हटले आहे. रोझा पॉवरने सप्टेंबरमध्ये वर्दे पार्टनर्सला 833 कोटी रुपये दिले होते. रोजा पॉवर उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरजवळील रोजा गावात 1,200 मेगावॅटचा कोळशावर आधारित औष्णिक विद्युत केंद्र चालवते. रिलायन्स होम फायनान्सशी संबंधित अपडेटदरम्यान, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि माजी अधिकाऱ्यांसह सहा पक्षांना 129 कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. कंपनीच्या निधीचा बेकायदेशीर गैरवापर झाल्याचा दाखला देत नियामकाने हा आदेश दिला. सेबीने या पक्षांना इशारा दिला आहे की जर त्यांनी 15 दिवसांत पैसे भरले नाहीत तर त्यांची मालमत्ता आणि बँक खाती गोठवली जातील.सेबीने या प्रकरणी Reliance Home Finance Ltd, रवींद्र सुधाळकर, अमित बापना, पिंकेश शाह, फी मॅनेजमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आधार प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड यांना नोटीस पाठवली आहे.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.