Hrishikesh Joshi : हरहुन्नरी अभिनेता ऋषिकेश जोशी (Hrishikesh Joshi) आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अभिनयासोबतच ऋषिकेशने लेखक आणि दिग्दर्शनाचीही जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली आहे. पण सध्या एका वेगळ्या कारणामुळे ऋषिकेश बराच चर्चेत आहे. त्याच्या अंगावरील दागिन्यांमुळे त्याला ही आवड कधी निर्माण झाली असा प्रश्न अनेकांना पडलाय.
आगामी ‘पाणीपुरी’ या चित्रपटातील ‘बबन’ ही व्यक्तिरेखा ऋषिकेश जोशी साकारत असून या बबनला अंगावर दागिने घालून मिरवण्याची हौस आहे. एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.
आपल्या भूमिकेविषयी ऋषिकेशने सांगितलं की, अंगावर किलोभर सोनं घालून फिरणारा ‘बबन’ हे एक मजेशीर पात्र आहे. बबनच्या गळयात सोन्याच्या चैनी असतात. हातात गोल्डचे कडे, ब्रेसलेट आणि घड्याळ असते. मला स्वतःला ही भूमिका करताना मजा आली.त्यामुळे प्रेक्षकही ही भूमिका एन्जॉय करतील. या सिनेमात ऋषिकेश जोशीसोबत विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे,प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर,अभय गिते हे कलाकार देखील आहेत.
चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत. मनोरंजनाची ही चटकदार ‘पाणीपुरी’ 15 नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
View this post on Instagram