मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
रोहित धामणस्कर November 07, 2024 06:13 PM

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी एकूण 4140 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये मुंबई उपनगर परिसरातील 26 मतदारसंघांचा समावेश आहे. या 26 मतदारसंघांमधून  एकूण 315 रिंगणात उतरले आहेत. मुंबई उपनगर परिसरातील लढती या आगामी राजकारणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. जो पक्ष मुंबई उपनगर परिसरातील जास्तीत जास्त जागा जिंकेल, त्या पक्षाचा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वरचष्मा राहतील. यादृष्टीने मुंबई उपनगर परिसरातील 26 मतदारसंघाचा निकाल हा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.  मुंबई उपनगरात 2019 मध्ये भाजपचे 12, शिवसेनेचे 9, काँग्रेसचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला होता. 

मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघातील प्रमुख लढती

विधानसभा मतदारसंघ महायुती उमेदवार मविआ उमेदवार वंचित \ मनसे \ अपक्ष \इतर
 बोरिवली संजय उपाध्याय (भाजप) संजय भोसले (ठाकरे गट) कुणाल माईणकर (मनसे)
  दहीसर मनीषा चौधरी (भाजप) विनोद घोसाळकर (ठाकरे गट) महेश फरकासे (मनसे)
मागाठाणे प्रकाश सुर्वे (शिंदे गट) उदेश पाटेकर (ठाकरे गट) विकास शिरसाट (वंचित)
कांदिवली अतुल भातखळकर (भाजप) कालू बुधेलिया (काँग्रेस) दिनेश साळवी (मनसे)
चारकोप योगेश सागर (भाजप)  यशवंत सिंग (काँग्रेस) दिलीप लिंगायत (वंचित)
मालाड विनोद शेलार (भाजप) अस्लम शेख (काँग्रेस) अजय रोकडे (वंचित)
जोगेश्वरी पूर्व नीशा वायकर (शिंदे गट)  अनंत (बाळा) नर (ठाकरे गट)  परमेश्वर रणशूर (वंचित)
दिंडोशी संजय निरुपम (शिंदे गट) सुनील प्रभू (ठाकरे गट) भास्कर परब (मनसे)
गोरेगाव      
वर्सोवा भारती लव्हेकर (भाजप) हारुन खान (ठाकरे गट)   संदेश देसाई (मनसे)
अंधेरी पश्चिम अमित साटम (भाजप) अशोक जाधव (काँग्रेस) पतीतपावन नित्य (बसपा)
अंधेरी पूर्व मुरजी पटेल (शिंदे गट) ऋतुजा लटके (ठाकरे गट) संजीव कुमार कलकोरी (वंचित)
मुलुंड मिहीर कोटेचा (भाजप) राकेश शेट्टी (काँग्रेस) प्रदीप शिरसाट (वंचित)
विक्रोळी सुवर्णा करंजे (शिंदे गट) सुनील राऊत (ठाकरे गट) विश्वजित ढोलम
भांडुप पश्चिम अशोक पाटील (शिंदे गट) रमेश कोरगावकर (ठाकरे गट) शिरीष सावंत (मनसे)
घाटकोपर पश्चिम राम कदम (भाजप) संजय भालेराव (ठाकरे गट) गणेश चुक्कल (मनसे)
घाटकोपर पूर्व पराग शाह (भाजप) राखी जाधव (शरद पवार गट) संदीप कुलथे (मनसे)
मानखुर्द शिवाजीनगर नवाब मलिक (अजित पवार गट)

सुरेश (बुलेट) पाटील (शिंदे गट)
अबू आझमी (सपा) जगदीश खांडेकर (मनसे)
विलेपार्ले पराग अळवणी (भाजप) संदीप नाईक (ठाकरे गट) जुईली शेंडे (मनसे)
चांदिवली दिलीप लांडे (शिंदे गट) नसीम खान (काँग्रेस) महेंद्र भानुशाली
कुर्ला मंगेश कुडाळकर (शिंदे गट) प्रविणा मोराजकर (ठाकरे गट) प्रदीप वाघमारे (मनसे)
कलिना अमरजित सिंग (भाजप) संजय पोतनीस (ठाकरे गट) संदीप हुटगी (मनसे)
वांद्रे पूर्व झिशान सिद्दीकी ( अजित पवार गट) वरुण सरदेसाई (ठाकरे गट) तृप्ती सावंत (मनसे)
वांद्रे पश्चिम आशिष शेलार (भाजप) असीफ झकेरिया (काँग्रेस) अजीज कुरेशी (बसपा)
अणुशक्तीनगर सना मलिक (अजित पवार गट) फहाद अहमद (शरद पवार गट)  
चेंबुर तुकाराम काते (शिंदे गट) प्रकाश फातर्फेकर (ठाकरे गट) माऊली थोरवे (मनसे)
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.