आयपीएल 2025 मेगा लिलावात युवराज सिंहसह कैफ आणि तेंडुलकरचीही नाव नोंदणी, जाणून घ्या बेस प्राईस
GH News November 07, 2024 06:16 PM

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये 24 आणि 25 नोव्हेंबरला लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियात एकूण 1574 खेळाडूंवर बोली लागणार आहे. 204 जागांसाठी हा लिलाव होणार असल्याने बहुतांश खेळाडू अनसोल्ड राहतील यात शंका नाही. त्यामुळे फ्रेंचायझी कोणावर किती बोली लावतात याची उत्सुकता आहे. या मेगा लिलावात युवराज सिंह आणि मोहम्मद कैफही उतरले आहेत. ही वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला का? नाव साध्यर्म असल्याने तसंच वाटलं असेल. युवराज सिंह आणि मोहम्मद कैफ हे देशांतर्गत क्रिकेटमधील युवा क्रिकेटपटू आहेत. यांच्यासोबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरनेही मेगा लिलावासाठी नाव नोंदणी केली आहे. या तिन्ही खेळाडूंनी काय बेस प्राईस ठेवली आहे ते जाणून घेऊयात.

युवराज सिंहने मेगा लिलावात आपली बेस प्राईस ही 30 लाख रुपये ठेवली आहे. 27 वर्षीय युवराज सिंह हा उत्तरप्रदेशचा आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत रेल्वेकडून खेळतो. युवराज सिंहने आतापर्यंत एकही टी20 सामना खेळलेला नाही. पण सात प्रथम श्रेणी सामन्यात 283 धावा केल्या आहेत. तसेच एक विकेटही गेतली आहे. लिस्ट ए सामन्यात त्याने 121 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीचा नात्याने भाऊ असलेल्या मोहम्मद कैफही लिलावात उतरला आहे. मोहम्मद कैफ देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाकडून खेळतो. आठ प्रथम श्रेणी सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. तर नऊ लिस्ट ए सामन्यात 12 विकेटन नावावर आहेत. त्यानेही बेस प्राईस ही 30 लाख रुपये ठेवली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही मैदानात उतरला आहे. मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज केलं आहे.अर्जुन तेंडुलकरने 2023 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तसेच 2024 मध्येही मुंबई इंडियन्स संघासोबत होता. अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत पाच सामन्यात 144 च्या स्ट्राईक रेटने 13 आणि 3 विकेट घेतल्या आहेत. त्याने बेस प्राईस 30 लाख रुपये ठेवली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.