येत्या दोन दिवसांत मी कार्यकर्त्यांशी बोलून पुढील दिशा ठरवणार असल्याचे मराठा महासंघाचे (Maratha Mahasangh) राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक (Vasant Mulik) यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कोल्हापूर : ‘विधानसभा निवडणुकीत (Kolhapur Assembly Elections) (Madhurimaraje Chhatrapati) यांना पाठिंबा देण्यासाठी मी माघार घेतली, त्यानंतर त्यांनीच अचानकपणे माघार घेतली. त्यामुळे माझी फसवणूक झाली.
माझा बळीचा बकरा केला, याबद्दल कार्यकर्ते तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. येत्या दोन दिवसांत मी कार्यकर्त्यांशी बोलून पुढील दिशा ठरवणार असल्याचे मराठा महासंघाचे (Maratha Mahasangh) राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक (Vasant Mulik) यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
‘सामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी माघार, आमचे ठरले होते, अशा पूर्वनियोजित गोष्टी ठरलेल्या असताना खासदार शाहू महाराज यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला माघार घेण्यासाठी शब्द का टाकला, माझी फसगत झाली’, असेही ते म्हणाले. ‘माझ्या माघारीनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. मी अर्ज मागे घेणे चुकीचे असल्याबद्दल जनता मला दोष देत आहे.
सामान्यांसाठी माघार ही भूमिका माझ्यावर अन्याय करणारी आहे. मी सामान्य कार्यकर्ता नाही का, मी पैसेवाला गब्बर आहे का? गेली ४० वर्षे शिव-शाहू विचाराने भारावलेला कार्यकर्ता आहे, तरीही माझा बळीचा बकरा का केला गेला’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.