नालासोपार्यात एटीएम व्हॅनमध्ये आढळले साडेतीन कोटी रुपये आढळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. नालासोपारा एसटी आगाराजवळ गुरूवारी दुपारी एका एटीएम व्हॅनमध्ये साडेतीन कोटी रुपयांची रोकड आढळली.
Maharashtra Election : काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीलाकाँग्रेसचे शिष्ट मंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला पोहोचले आहेत. सचिन सावंत, पवन खेरा यांचं शिष्टमंडळ भेटीला पोहोचलं आहे. ते भाजपच्या जाहिरातीविरोधात तक्रार करणार आहेत.
Akola News : अकोल्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा गर्दीत अडकलाअकोल्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेत सुरक्षा यंत्रणेचा हलगर्जीपणा पाहायला मिळाला. अकोल्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा गर्दीत अडकला. देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत चुकीनंतर पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आलाय. अकोला जिल्ह्यातील वाडेगावात सभेनंतरच्या गर्दीमुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा अडकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बाळापूर मतदारसंघातल्या वाडेगावात बळीराम सिरस्कारांसाठी सभा होती. सभा संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा गर्दीत अडकला. मुख्यमंत्र्यांचा ताफा गर्दीतून काढतांना सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली. मोठ्या प्रयत्नानंतर गर्दीतून मुख्यमंत्र्यांचा ताफा निघाला. तब्बल तीन ते चार मिनिट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा गर्दीत अडकला होता.
Maharashtra Politics : मनसेला मोठा धक्का; अखिल चित्रेंचा ठाकरे गटात प्रवेशमनसेला मोठा धक्का बसला आहे. अखिल चित्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
Ajit Pawar News Live : अजित पवार उद्यापासून महाराष्ट्रात लावणार सभांचा धडाकापुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उद्यापासून महाराष्ट्रात घेणार सभा
महाराष्ट्रात जवळपास ६० सभा होणार
अजित पवार घेणार दिवसाला ४ -५ सभा
राज्यभर सभांचा धडका आणि रोड शोही घेणार
Shahrukh khan News Live : अभिनेता शाहरूख खानला धमकीचा कॉलसलमान खानला वारंवार धमक्या येत असून, आता बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानला देखील धमकी मिळाली आहे.
या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धमकीचा कॉल रायपूरवरून करण्यात आल्याचे स्पष्ट
मुंबई पोलिसांचे पथक रायपूरमध्ये दाखल
Political News Live : शिंदे गटाला धक्का, वरळीतील पदाधिकारी ठाकरे गटात करणार प्रवेशमुंबईत शिंदे गटाला ऐन निवडणुकीत मोठा धक्का
वरळीमधील शिंदे गटाचे पदाधिकारी थोड्याच वेळात मातोश्रीवर ठाकरे गटात करणार प्रवेश
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
चार दिवसांपूर्वी वरळीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला होता.
Pimpri chinchwad Live : कारमध्ये सापडली ३५ लाखांची कॅश, पिंपरी-चिंचवडमध्ये कारवाईपिंपरी चिंचवड गावात 35 लाख 11 हजार 200 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पॅट्रोलिंग दरम्यान एका चारचाकी वाहनातून पैसे घेऊन जात असताना पोलिसांनी केली कारवाई
जप्त केलेली रोकड कोणाची आणि कुठे घेऊन जात होते याचा तपास सुरू
Maharashtra Politics Live Update : टीका मर्यादेत करावी, सदाभाऊंना शिरसाटांचा सल्लासदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या नेत्याने प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील कोणताही नेता असो, वरिष्ठ नेत्याबद्दल अपमानास्पद बोलणे योग्य नाही. टीका मर्यादेत केली पाहिजे अशी टीका कोणीही कुणाकडे करू नये. त्याबाबत सदाभाऊ खोत यांनी माफी मागितली होती, असे शिरसाट म्हणाले.
Maharashtra Politics Live : ऐन निवडणुकीत काँग्रेसची बंडखोरांवर कारवाई, पुण्याचे आबा बागुल, व्यवहारे, आनंद ६ वर्षांसाठी निलंबितपुण्यातील आबा बागुल, कमल व्यवहारे आणि मनिष आनंद या बंडखोर नेत्यांना सहा वर्षांसाठी निलंबित
राज्यातील कॉंग्रेसच्या इतर बंडखोरांवर देखील कारवाई
मनीष आनंद, कमल व्यवहारे यांनी दिला काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा
काँग्रेसमधून बंड केलेले अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्यावर काँग्रेसने केली कारवाई
आबा बागुल पर्वती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत
कमल व्यवहारे काँग्रेसचा राजीनामा देत कसबामधून निवडणूक लढवणार आहेत
मनीष आनंद हे सुद्धा काँग्रेसचा राजीनामा देत शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत
Devendra Fadnavis : राहुल गांधींची नौटंकी; देवेंद्र फडणवीसांकडून टीकास्त्रनागपूर : एकूणच भारताच्या संविधानाबद्दल राहुल गांधींची अनास्था काल पाहयला मिळाली. माझा आरोप खरा ठरला. लाल पुस्तक हातात घेऊन ते संविधानाचा गौरव करत नाहीत, तर त्यांच्यासोबत अर्बन नक्षल आहेत, सोबत जे फुटीरतावादी आहेत, त्यांना एक प्रकारचा इशारा (संकेत) देण्याकरता, त्यांची मदत घेण्याकरता हे नाटक आणि नौटंकी करत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
संविधानाचा रोज ते अवमान करत आहेत. आजपर्यंत काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला. संविधानाचा अवमान केला. आता त्यांच्या या नौटंकीला कोणीच भुलणार नाही, असेही ते म्हणाले. फडणवीस नागपुरात बोलत होते.
Nashik Police : नाशिकमधील रेकॉर्डवरचे २० गुन्हेगार तडीपारनाशिक शहरातील तब्बल २० गुन्हेगार तडीपार
आणखी ४५ गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव
आत्तापर्यंत ९८ गुन्हेगारांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सराईत गुन्हेगारांवर कारवाई
निवडणुकीदरम्यान शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Sharad Pawar Group : शरद पवारांबद्दल सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त वक्तव्य, शरद पवार गट आक्रमकSadabhau Khot : शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. सदाभाऊ खोत यांचा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे. बारामतीतील तीन हत्ती चौकात कार्यकर्त्यांनी निषेध केला.
Pune News: सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलनसदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्यात आंदोलन
शरद पवार यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी काल भाषणात केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
पुण्यात आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून आंदोलन
सदाभाऊ खोत यांच्या फोटो वर मारली "फुली"
पुणेरी स्टाईल ने फोटो फ्लेक्स वर आधी "श्री" लिहून "सदाभाऊ खोत मुर्दाबाद" असा मजकूर
Nashik News: नाशिकमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभानाशिकमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा
नाशिकच्या तपोवन परिसरातील मोदी मैदानावर पंतप्रधान मोदींची दुपारी सभा पार पडणार
मोदींच्या या सभेची सध्या मोदी मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे
तब्बल १ लाख व्यक्ती बसू शकतील इतक्या भव्य मंडप सभास्थळी उभारला जातोय
Satara News: सातारा जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडीला मोठा धक्कासातारा जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडीला मोठा धक्का
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली भेट
भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत शेखर गोरे यांना आगामी काळामध्ये विधान परिषदेवर घेणार असल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला शब्द सूत्रांची खात्रीशीर माहिती
Jammu-kashmir - जम्मू काश्मीर विधानसभेत आज परत कलम ३७० वरुन राडाजम्मू काश्मीर - जम्मू काश्मीर विधानसभेत आज परत कलम ३७० वरुन राडा
खासदार इंजिनीयर रशीद यांचे भाऊ आणि आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 वर बॅनर प्रदर्शित केलं
यानंतर विधानसभेत गोंधळ झाला
विरोधी पक्ष नेते सुनील शर्मा यांनी यावर आक्षेप घेतला
Nagpur News: शरद पवार नागपूर विमानतळावरून हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे दाखलशरद पवार नागपूर विमानतळावरून हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे दाखल झाले आहे..
अनिल देशमुख, आणि रमेश बंग यांच्या उपस्थितीत पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत आहे...
याच हॉटेलमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा उपस्थित आहे..
नाना पाटोले शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता...
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावरविधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या पार पडणार धुळ्यात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची प्रशासनातर्फे जय्यत तयारी सुरू..
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन देखील सज्ज...
सभेदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राहणारा तैनात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी...