सुपारीएवढी टिकली, कांजीवरम साडी.. 'या' गायिकेच्या भारदस्त आवाजानं दम मारो म्हणत लावलं वेड
मुक्ता सरदेशमुख November 08, 2024 08:43 AM

Usha Uthup Birthday: सुपारीएवढी टिकली, कांजीवरम साडी, केसात गजरा आणि भारदस्त आवाजातलं दम मारो दम गाणं. या गायिकेपासून बॉलिवूडमध्ये पॉप गाण्यांना असा रंग चढला की भल्याभल्यांना या गायिकेनं आपल्या तालावर थिरकायला लावलं आणि बॉलिवूडच्या पॉप स्टाईलची गाणी गणपती मिरवणूक असो की नाईट क्लब सगळीकडंच वाजू लागली. पार्ट्यांमध्ये तर या गायिकेच्या आवाजाची जरब मोठ्याच बेधुंदीत ऐकली जाऊ लागली. हा आवाज कोणाचा आहे हे आतापर्यंत सगळ्यांनाच कळला असेल. बॉलिवूडची पॉप क्विन उषा उत्थप यांचा हा आवाज. बॉलिवूडच्या गोड गळ्यांनी तर देशातील संगीतप्रेमींच्या आनंदात भर टाकलीच पण बाईचा आवाज भारदस्तही असू शकतो आणि पुरुषांच्या आवाजाला तो जबरदस्त टक्कर देऊ शकतो हे उषा उत्थप यांच्या आवाजानं घराघरात ते पोहोचलं. आज उषा उत्थप त्यांचा  77  वा वाढदिवस साजरा करतायत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातले काही Interesting किस्से..

नाईट क्लबमधून गायला सुरुवात

उषा उत्थप यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1947 मध्ये तमिळनाडूमध्ये मद्रासच्या एका तमिळ ब्राम्हण कुटुंबात झाला. वयाच्या विसाव्या वर्षी साडी घालून चेन्नईच्या माउंट रोडवरच्या सफायर थेएटर कॉम्प्लेक्सच्या तळघरात असणाऱ्या एका नाईट क्लबमध्ये उषा यांनी गाणं सुरु केलं. 

देवआनंद यांच्यामुळे आल्या बॉलिवूडमध्ये

नाईट क्लबमध्ये सुरुवात झालेला गाण्याचा प्रवास तेलगु, तमिळ चित्रपटांपासून सुरु झाला. त्यावेळी बॉलिवूडचा चार्मिंग स्टार देवानंद यांच्यामुळे त्या बॉलिवुडमध्ये पाऊल ठेवलं. देवानंदमुळे बॉम्बे टॉकिजशी संबध आला आणि शंकर जयकिशन यांच्यासोबत उषा यांनी इंग्रजी गाणीही गायली. मग अनेक चित्रपटांमध्ये गाण्याची संधी उषा यांना मिळाली. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात उषा यांनी आरडी बरमन आणि बप्पी लहिरी यांच्यासोबतही अनेक गाणी गायली.

साडी, टिकली, गजरा अन् दागिन्यांचा ट्रेंड

डार्क शेडच्या कांजिवरम साड्या, सुपारीएवढी वर्क असणारी मॅचिंग टिकली, केसात गजरा आणि अंगभर दागिने घालून स्टेजवर येणाऱ्या उषा उत्थप यांच्या राहण्याचा ट्रेंड सुरु झाला होता. ठेवणीतल्या साड्या आणि स्टेजवर आपल्या दणदणीत आवाजाचा असणारा विनिंग ॲटिट्यूड हे कॉम्बिनेशन चर्चेचा विषय ठरलं. दमदार आवाजानं ऐकणाऱ्याला पॉप गाण्यांची आवड उषा उत्थप यांच्या गाण्यांनी भारतीय संगीतप्रेमींना लावली.

लोकप्रीय गायकांसोबत केलं काम

उषा उत्थप यांनी बॉलिवुडच्या विश्वात स्वत:च्या आवाजाच्या जोरावर नाव कमवलं. उषा उत्थुप  यांनी आपल्या करियर मध्ये दम मारो दम, डिस्को डांसर, हरे कृष्णा हरे राम, शालीमार और प्यारा दुश्मन अशा कितीतरी लोकप्रीय गाण्यांना आपला आवाज दिला.  

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.