Maha Vikas Aghadi Panchsutri farmer loan waiver scheme announced sharad pawar urk
Marathi November 08, 2024 10:25 AM


मुंबई – महायुती सरकारने महाराष्ट्र उद्धवस्त केला आहे. त्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. हा भ्रष्टाचार कोणत्या थराला गेला, याचे एकच उदाहरण पुरेसे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यातही महायुती सरकारने भ्रष्टाचार केला, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची कर्ज माफी देण्याची गॅरंटी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या पंचसुत्रीची घोषणा केली.

– Advertisement –

शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या पंचसुत्रीतील सर्वात महत्त्वाची कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली. ते म्हणाले की,
आमचं सरकार आल्यावर आम्ही कृषी समृद्धी योजना लागू करणार. या योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याचे तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत करणार असल्याचे पवार म्हणाले.

महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे सरकार

शरद पवार यांनी महायुतीवर जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, या सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही यांनी भ्रष्टाचार केला. महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे हे सरकार आहे.

– Advertisement –

Maha Vikas Aghadi Panchsutri farmer loan waiver scheme announced sharad pawar
शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची कर्ज माफी देण्याची गॅरंटी

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : मविआची पंचसूत्री जाहीर; महिलांसाठी दरमहा 3 हजार, बेरोजगारांना 4 हजार 

पहिली गॅरंटी दिली राहुल गांधींनी

महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. ते म्हणाले की, प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात ही रक्कम दिली जाईल. तीन हजार रुपये खटाखट खटाखट दिले जातील. महाराष्ट्रतील महिला महाराष्ट्रात बसमध्ये गेल्या तर त्यांना बस प्रवास मोफत केला जाईल. कारण तुम्हाला महागाईने या सरकारने त्रस्त करुन टाकलं, तसंच गॅस सिलिंडर वाढ, महागाई यामुळे महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आम्ही ही पहिली गॅरंटी जाहीर करत आहोत असं राहुल गांधींनी सांगितलं. इतर गॅरंटी तुम्हाला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खर्गे सांगतील असंही राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : मविआची पंचसूत्री जाहीर; महिलांसाठी दरमहा 3 हजार, बेरोजगारांना 4 हजार

Edited by – Unmesh Khandale



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.