आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
नामदेव जगताप November 08, 2024 10:43 AM

Singham Again Box Office Collection Day 7: रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम अगेन' (Singham Again) थिएटरमध्ये दमदाक परफॉर्म करत आहे. मल्टी स्टारर चित्रपटात अजय देवगन (Ajay Devgn), टाइगर श्रॉफ (Tiger Shroff), अक्षय कुमार (Akshay Kumar), रणवीर सिंह (Ranveer Singh), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. अशातच दबंगमधील सलमान खानच्या चुलबूल पांडेच्या कॅमिओची विशेष चर्चा झाली. पण, चित्रपटाच्या कमाईवर तसा फारसा चांगला फरक दिसला नाही. 

बॉलिवूडपट आणि त्यात रोहित शेट्टीचं दिग्दर्शन म्हणजे, दमदार स्टारकास्ट, अंगावर शहारे आणणारे स्टंट आणि त्यासोबतच कॉमेडी... हे जणू समीकरण झालं आहे. असाच मनोरंजनाच्या सर्व घटकांनी परिपूर्ण असलेला 'सिंघम अगेन' पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक थिएटरमध्ये पोहोचले आहेत. विकेंडला सिंघम अगेननं मोठा गल्ला जमवला, पण विकडेजमध्ये मात्र गाडी कुठेतरी रखडली.  सध्या चित्रपटाच्या कमाईत कमालीची घट पाहायला मिळत आहे. पण तरीसुद्धा चित्रपटांची कमाई दुहेरी अंकात पाहायला मिळत आहे. 'सिंघम अगेन'नं रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच, पहिल्या बुधवारी किती कलेक्शन केलं, ते जाणून घेऊयात... 

'सिंघम अगेन'नं सातव्या दिवशी कितीचा गल्ला जमवला? 

'सिंघम अगेन' चित्रपटगृहात गाजत असून रिलीज होऊन आज एक आठवडा झाला आहे. रिलीजच्या 7 दिवसांत या अजय देवगन स्टारर चित्रपटानं चांगली कमाई केली आहे आणि अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. विशेष म्हणजे, दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कार्तिक आर्यन स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3'शी टक्कर झाली होती, परंतु त्याची दमदार कथा, शानदार स्टारकास्ट आणि पॉवर पॅक्ड ॲक्शन यामुळे रोहित शेट्टीचा सिंघम अगेन प्रेक्षकांची पहिली पसंती ठरला. भरपूर गल्लाही जमवला. 

'सिंघम अगेन'च्या सात दिवसांच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 43.5 कोटी रुपयांचं खातं उघडलं. यानंतर चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 42.5 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 35.75 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 18 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 14 कोटी रुपये आणि सहाव्या दिवशी 10.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 7 व्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे काही आकडे समोर आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सिंघम अगेन' नं रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच, पहिल्या गुरुवारी 8.75 कोटी रुपये कमवले आहेत. यासोबतच 'सिंघम अगेन'ची सात दिवसांची एकूण कमाई आता 173.00 कोटींवर पोहोचली आहे. घटत्या कमाईसह 'सिंघम अगेन' आपलं भांडवल तरी वसूल तरू शकेल का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. 'सिंघम अगेन'ची कमाई विकडेजमध्ये सातत्यानं घटत असल्याचं पाहायला मिळत आहे. सातव्या दिवशी हा चित्रपट सिंगल डिजिटवर आला. चित्रपटाच्या कमाईचा आलेख पाहता आता निर्मात्यांचीही चिंता वाढली आहे. खरं तर, या चित्रपटानं रिलीजच्या सात दिवसांत 200 कोटींचा आकडाही गाठलेला नाही, अशा परिस्थितीत 350 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाला त्याची किंमत वसूल करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे.

तर, दुसरीकडे दुसऱ्या वीकेंडला चित्रपटाची कमाई वाढेल आणि तो भरघोस कलेक्शन करेल, असा अंदाज आहे. सध्या सर्वांच्या नजरा बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवर खिळल्या आहेत. आता येत्या विकेंडला तरी सिंघम अगेनचा गल्ला वाढणार का? आणि चित्रपट बक्कळ कमाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Citadel: Honey Bunny: वरुण-समांथाचा लिपलॉक VIDEO Viral, इंटेंस केमिस्ट्रीनं हादरलं OTT, चाहते म्हणाले, फायर... दमदार केमिस्ट्री

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.