Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Salman Khan Threat: बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानला (Salman Khan) येणाऱ्या धमक्यांचं सत्र काही कमी होण्याचं नाव घेत नाही. सलमान खानला सातत्यानं जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. अशातच सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. बिश्नोई गँगकडून (Lawrence Bishnoi Gang) ही धमकी आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सातत्यानं येणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या आणि बिश्नोई गँगकडून करण्यात आलेली माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या या पार्श्वभूमीवर सलमान खानला मोठी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सलमान खानचं वांद्रे येथील घर, त्यानंतर तो जिथे जाईल ते शुटिंग डेस्टिनेशन किंवा सेट सगळीकडे पोलिसांचं मोठं वलय पाहायला मिळत आहे. अशातच सलमान खाननंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानलाही धमकी आल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Marathi Serial : कलर्स मराठी वाहिनीवर (Colors Marathi) लवकरच दोन नव्या मालिका सुरु होणार आहेत. 'अशोक मा.मा' आणि 'पिंगा गं पोरी पिंगा' या दोन नव्या मालिकांची घोषणा नुकतीच कलर्सवर करण्यात आली आहे. येत्या 25 नोव्हेंबरपासून या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतातय. त्यामुळे कोणत्या जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यातच आता बिग बॉस फेम अभिनेत्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरु झालेली त्याची मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं निश्चित झालं आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका तब्बल पाच वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मालिकेविषयी बरीच चर्चा सुरु आहे. त्यातच आता स्टार प्रवाह वाहिनीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. ही मालिका देखील मागील तीन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम अगेन' (Singham Again) थिएटरमध्ये दमदाक परफॉर्म करत आहे. मल्टी स्टारर चित्रपटात अजय देवगन (Ajay Devgn), टाइगर श्रॉफ (Tiger Shroff), अक्षय कुमार (Akshay Kumar), रणवीर सिंह (Ranveer Singh), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. अशातच दबंगमधील सलमान खानच्या चुलबूल पांडेच्या कॅमिओची विशेष चर्चा झाली. पण, चित्रपटाच्या कमाईवर तसा फारसा चांगला फरक दिसला नाही.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
दिवाळीच्या निमित्तानं बॉलिवूड फॅन्सना मनोरंजनाचा फराळ देण्यात आला. दिवाळीच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. एक रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' आणि दुसरा कार्तिक आर्यन अभिनित 'भूल भुलैया 3'. दोन्ही चित्रपटंची बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर झाली. विकेंडच्या दिवशी दोन्ही चित्रपटांनी मोठा गल्ला जमवला. पण विकडेजमध्ये कमाईत काहीशी घट पाहायला मिळाली. पण, अशातही मल्टीस्टारर 'सिंघम अगेन'ला कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3'नं मागे टाकत आपली घौडदौड सुरूच ठेवली आहे. 'भूल भुलैया 3' मध्ये रूह बाबा म्हणून कार्तिक आर्यननं आपलं वर्चस्व गाजवलं. तर कार्तिकला एक नाही, दोन मंजुलिकांनी दमदार साथ दिली. लोकांना हा चित्रपट इतका आवडला की, अजय देवगनच्या बिग बजेट आणि मल्टीस्टारर 'सिंघम अगेन'शी संघर्ष असूनही, चित्रपटानं आपल्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नितीन चौहानने (Nitin Chauhan) वयाच्या 35 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. नितीनने गुरुवारी मुंबईत निधन झाले. त्याच्या एका सहकलाकाराने सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे. नितीनच्या जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. पण नितीनने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी पहिल्या बाळाचं स्वागत केलं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या चिमुकल्या राजकुमारीच्यी नावाची घोषणा केली. रणवीर आणि दीपिकाने मुलीचं नाव दुआ ठेवलं आहे. आता आई दीपिका डिलिव्हरीनंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आली आहे. इतकंच काय तर दो महिन्यानंतर लाडक्या दुआची पहिली झलक मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आई आणि लेकीचा घराबाहेर पडल्याचा व्हिडीओ समोर आली आहे. ज्यामध्ये दीपिकाच्या उराशी चिमुकली दुआ बिलगलेली असून बाजूला रणवीर सिंह दिसत आहे.