आपल्या सहजसुंदर नृत्याने घायाळ करणाऱ्या अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यागंणा म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील. गौतमी पाटील हे नाव आज शहरापासून ते खेडे गावपर्यंत कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गौतमी पाटीलनं तिचं नाव कमावलं आहे. गौतमी पाटीलचा आजवरचा प्रवास संघर्षमय आहे.
गौतमी पाटीलचा जन्म शिक्षण फक्त आठवीपर्यंत झाले आहे. गौतमी पाटील मूळची खेडा शिंद या गावची आहे. गौतमी पाटील लहान असताना वडिलांनी आई आणि मुलगी गौतमीची साथ सोडली. नंतर या दोघींही गौतमीच्या मामाकडे राहायच्या. गौतमी आठवीत असताना पुण्यामध्ये आली. मुलगी मोठी झाल्याने तिने आई- वडिलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला मात्र गौतमीच्या वडिलांना दारूचे व्यसन होते. ते गौतमीच्या आईला मारायचे यामुळे गौतमीची आई काम करून घर सांभाळायची.
पुढे, गौतमी आठवीत असताना आईचा अपघात झाला. त्यांनतर घरामध्ये कमावणारं कोणीही नव्हते. घराचा खर्च आईच्या आजारपणाचा खर्च यामुळे पैशांची मोठी चणचण भासू लागली. यामुळे पुढे घराची जबाबदारी गौतमीने घेतली. गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. गौतमीने लावणी करून घर सांभाळण्याचा निर्णय घेतला. सुरूवातील गौतमीने अकलूज येथील लावणी महोत्सवात पहिल्यांदा नृत्य केले. यावेळी तिला ५०० रूपये मिळाले होते. या क्षेत्रात नवीन असल्याने सुरूवाती बॅक डान्सर म्हणून गौतमी कार्यक्रमात डान्स करायची. यानंतर गौतमीच्या सौंदर्याने आणि नृत्याच्या अदाकारीने गौतमीला खरी ओळख मिळाली. पुढे गौतमी पाटील कार्यक्रमांना बोलावण्यात आले. विविध शहरात गौतमीच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी झाली. गौतमीला फॉलो करणाऱ्याची संख्या वाढली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून गौतमी पाटीलला प्रेम मिळाले.