भारताशी संबंध मजबूत केल्याचा बिडेन प्रशासनाला अभिमान अमेरिका परराष्ट्र मंत्रालयाचे मिलर यांचे वक्तव्य
Webdunia Marathi November 08, 2024 10:45 PM

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतासोबतचे संबंध दृढ करण्याचा बिडेन प्रशासनाला अभिमान असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी माध्यमाशी संवाद साधताना म्हणाले.

मिलर म्हणाले, 'मी म्हणेन की भारतासोबतचे आमचे संबंध दृढ करणे ही या प्रशासनाला अभिमानास्पद गोष्ट आहे. क्वाडच्या माध्यमातून आमचे वाढते सहकार्य आणि अनेक सामायिक प्राधान्यक्रमांमुळे आमचे संबंध अधिक दृढ झाले आहेत.भारताशी असलेले संबंध हे आमचे मोठे यश आहे' मिलर म्हणाले.

बिडेन सरकारच्या अखत्यारीत भारत आणि यूएस दरम्यान iCET (इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी), यूएस शस्त्रास्त्रांमध्ये प्रवेश आणि चीनची आक्रमकता रोखण्यासाठी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान एकत्रितपणे काम करत आहेत. हिंद पॅसिफिक महासागरातही युती क्वाड सतत मजबूत होत आहे.

अमेरिकेत कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी भारतासोबतचे अमेरिकेचे संबंध दृढ राहतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Edited By - Priya Dixit

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.