5 दिवसात छापले 57 हजार कोटी; Tata च्या या कंपनीची कमाल, रिलायन्स कंपनीला जबरदस्त झटका
Shital Mandal November 11, 2024 04:54 AM

शेअर बाजारात गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकाला मोठा फटका बसला. या पाच व्यापारी सत्रात सेन्सेक्समधील 10 कंपन्यामधील 6 कंपन्यांना मोठा तोटा झाला. त्यांचे एकूण 1.55 लाख कोटी रुपये स्वाहा झाले. तर चार कंपन्यांनी नोटा छापल्या. त्यांनी बाजारातून ताबडतोब कमाई करून दिली. टाटा समूहाची कंपनी TCS ने तर कमाल केली. पाच दिवसांतील व्यापारी सत्रात टीसीएसच्या गुंतवणूकदारांनी 57 हजार कोटी रुपये छापले.

सेन्सेक्स दणकावून आपटला

या आठवड्यात BSE बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स 4813 अंकांनी आपटला. 30 सप्टेंबर रोजी सेन्सेक्स 84,200 अंकावर होता. तो घसरून 8 नोव्हेंबर रोजी 79,486 अंकावर उतरला. दलाल स्ट्रीटवर कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालाचा परिणाम दिसून आला. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एचयुएल आणि एलआयसीच्या बाजारातील मूल्यात घसरण दिसली. तर चार कंपन्याना मोठा फायदा झाला. त्यात टीसीएससह एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि एसबीआयचा समावेश आहे.

मुकेश अंबानी यांना मोठा झटका

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला सर्वात मोठा फटका बसला आहे. Reliance चे मार्केट कॅप 74,563.37 कोटी रुपयांहून घसरून 17,37,556.68 कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. याशिवाय Bharti Airtel MCap 26,274.75 कोटी रुपयांनी घसरले. ते 8,94,024.60 कोटींपर्यंत खाली आले आहे. ICICI बँकेच्या गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले आहे. बँकेचे मार्केट कॅप 22,254.79 कोटींनी कमी होऊन 8,88,432.06 कोटींवर आले आहे. ITC ला 15,449.47 कोटींचा तोटा झाला आहे. तर कंपनीचे बाजारातील मूल्य कमी होऊन 5,98,213.49 कोटी रुपयांवर आले आहे. एलआयसीचे बाजारातील मूल्य 9,930.25 कोटी रुपयांनी कमी झाले. ते आता 5,78,579.16 कोटी रुपयांवर आले आहे. तर HUL मार्केट कॅप 7,248.49 कोटींनी घसरून 5,89,160.01 कोटी रुपये इतके झाले आहे.

TCS ची जोरदार कमाई

तर दुसरीकडे टीसीएस कंपनीचे बाजारातील मूल्य वाढून ते 14,99,697.28 कोटी रुपये इतके झाले आहे. पाच व्यापारी सत्रातच गुंतवणूकदारांनी 57,744.68 कोटी रुपये छापले. तर दुसरी दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे बाजारातील मूल्य 28,838.95 कोटींनी उसळले ते वाढून 7,60,281.13 कोटी रुपयांवर पोहचले. तर एसबीआयच्या नफ्यात 19,812.65 कोटी रुपयांची वाढ झाली. बँकेचे मार्केट कॅप 7,52,568.58 रुपयांवर पोहचले. तर एचडीएफसी बँकेचे बाजारातील मूल्य 14,678.09 कोटी रुपयांनी वाढून 13,40,754.74 कोटी रुपये झाले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.