मुंबई : पवार कुटुंब एकसंघ राहायला हवं, अशी बारामतीच्या लोकांची इच्छा आहे. बारामतीमधे लोकांचं ठरलं होतं लोकसभेला ताई विधानसभेला दादा. आता काही दिवसांनी पवार कुटुंब एकत्र येतीलच, असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.
सुप्रीम कोर्टाने मेडिकल ग्राउंडवर मला जामीन दिला आहे. हायकोर्टात जोपर्यंत जामिनावर निर्णय होतं नाही तोपर्यंत हा जामीन लागू असेल, असं सांगण्यात आलं आहे. सुरुवातीला बेल मिळाली त्यावेळी मला माध्यमांमधे बोलायला बंदी होती. मात्र ज्यावेळी शेवटची सुनावणी झाली त्यावेळी मात्र केवळ केस वर बोलू नका एवढच स्पष्ट केलं आहे. बाकी विषयावर बोलायला आता मला बंदी नाही. माझ्या हितचिंतकांमध्ये आता त्रास होतो आहे. त्यामुळे माझा जामीन रद्द करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. कोर्टाची लढाई आम्ही लढत राहू.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली. या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक बाबींवर भाष्य करत महत्वाचे मुद्दे उघड केले आहे. यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, चांदिवाल आयोगने अहवाल सादर केलाय. तो कधी पटलावर ठेवायचा हा सरकारचा अधिकार आहे. सचिन वाझेने माझ्यावर देखिल आरोप केले होते. मला देखील नोटीस आली होती. सचिन वाझे यांचं म्हणणं होतं की मी त्यांच्यावर आरोप करतोय. त्यामुळे सुनावणी मध्ये अडथळे निर्माण होतील. असेही नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान, मी रेल्वेला पत्र लिहिलं आहे आणि विशेष ट्रेनची व्यवस्था उत्तरप्रदेश मधून महाराष्ट्रात करावी, अशी विनती केली आहे. कारण छटपुजेसाठी अनेकजण गावी गेले आहेत. त्यांना मतदानासाठी मुंबईत यायचे आहे.
ही ही वाचा