विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी सांगितलं की, 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी पाच बैठका झाल्यात, असं अजित पवार यांनी म्हटंलय. या बैठकीला शरद पवार, अमित शाह यांच्यासह गौतम अदानी, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते, दिल्लीत उद्योगपती गौतमी अदानी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली होती. तर शरद पवारांच्या माहितीनुसारच हे सगळं झालं होतं, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केलाय. शरद पवारांच्या माहितीनुसारच सगळं झालं होतं पण सगळा दोष माझ्यावरच टाकला गेला आणि मी तो स्वीकारलाय. मी दोष स्वीकारला आणि इतरांचे संरक्षण केले, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी गौतम अदानी, भाजप आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध होता. 2019 विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यावेळी पहिल्यांदा भाजपासोबत सरकार स्थापन केलं होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री बनले होते.