महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? माझं नाव घेतलं की हिंदू मुस्लीम करता येतं, मनोज जरांगे पाटलांचं नाव घ्या; ओवेसींचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
जयदीप मेढे November 13, 2024 03:13 PM

Asaduddin Owaisi : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे प्रमुख आणि हैदराबादचे लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक है तो सेफ है' या विधानावरून जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, 'पंतप्रधान मोदी म्हणतात की 'एक है तो सेफ है', तुम्ही 10 वर्षे सेफ नाही का? मी म्हटलं की आपण एक आहोत तर एकजूट आहोत. त्याच्याकडे काम नाही, ते फक्त डायलाॅग लिहितात, पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा उद्देश काय? ते कोणाला एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत? ते देशाला जोडण्याचा प्रयत्न करत नाहीत.

तुमच्या वडिलांनी किती मुलांना जन्म दिला? 

ते पुढे म्हणाले की, "पीएम मोदी, मला सांगा, तुमच्या वडिलांनी किती मुलांना जन्म दिला. अमित शाहांच्या वडिलांनी किती मुलांना जन्म दिला. आता कोणताही संघी म्हणेल, ओवेसी, तुम्हाला किती मुले आहेत? मला सहा मुले आहेत. तुम्ही नाही केले तर मी काय करू, मुस्लिम महिला अधिक मुलांना जन्म देतात, असे मोदींचे म्हणणे आहे, ते फक्त त्यांची मतपेढी एकवटण्याचा प्रयत्न करत आहेत."

देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला

असदुद्दीन ओवेसी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवत म्हटले, "ते म्हणतात, ओवेसी हैदराबादला जा. महाराष्ट्र कुणाच्या बापाचा आहे का? ऐका, आमचे वडील जेव्हा जगात आले तेव्हा भारतात आले, त्यामुळे ही जमीन माझ्या वडिलांची आहे. "फडणवीस कोणाच्या विरोधात मत जिहाद बोलत आहेत? निवडणूक आयोगाने त्यांच्या शब्दांची दखल घ्यावी."ते पुढे म्हणाले की, "राज्याचे गृहमंत्री असताना ते व्होट जिहादबद्दल बोलत आहेत. माझ्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याने असे विधान केले असते तर मीडियाने आत्तापर्यंत आम्हाला दुल्हा बनवलं असतं आणि हे असेच चालू राहिले असते. कटेंगे तो बटेंगे और एक रहेंगे तो सेफ रहेंगे असे सांगून मतदारांचे ध्रुवीकरण करत आहेत."

ओवेसी पुढे म्हणाले की, "भाजपवाले महाराष्ट्राच्या विकासावर बोलत नाहीत. फडणवीस माझे नाव घेत आहेत, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव घ्यावे, त्यांचे नाव घेणार नाहीत, कारण माझे नाव घेतल्याने हिंदू-मुस्लीम करता येतं. भाजपने सांगावे मराठ्यांना आरक्षण देणार की नाही?

मुख्यमंत्री योगी यांच्यावर हल्लाबोल 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, "अयोध्या हरली तर ते धार्मिक युद्ध होते का? योगी म्हणत आहेत की बटेंगे तो कटेंगे, ही मुख्यमंत्र्यांची भाषा आहे का? तुम्ही फूट पाडत आहात, बुलडोझरने तुम्ही लोकांची घरे पाडता आहात." अतिक अहमदला गोळ्या घातल्या, मी मृत्यूला घाबरत नाही, हा देश आमचा आहे, राहील. वक्फ कायद्याबाबत ते म्हणाले की, "वक्फ कायदा केल्यास वक्फ संपत्ती नष्ट होईल. वक्फ कायदा केल्यास भिंवडीतील मशिदी हिसकावून घेतल्या जातील, मदरसे बंद होतील. आम्ही एक मशीद गमावली आहे. आम्हाला वक्फ संपत्ती वाचवण्यासाठी लढावे लागेल, त्याची मालकी ओवैसीची नाही अल्लाहची आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.