SA vs IND : टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार भयंकर बदल! सूर्या कुणाला देणार डच्चू?
GH News November 13, 2024 01:08 AM

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला पहिल्या टी 20I सामन्यात पराभूत करत विजयी सलामी दिली. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात छोट्या धावसंख्येचा बचाव करत जवळपास सामना आपल्या पारड्यात झुकवला होता. मात्र अखेरच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे भारताने सामना गमावला आणि दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघाकंडे आघाडी घेण्याची संधी आहे. दोन्ही संघासाठी तिसरा सामना निर्णायक असणार आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव तिसर्‍या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.

अभिषेक शर्माला डच्चू!

टीम इंडियाचा विस्फोटर सलामीवीर अभिषेक शर्मा याला गेल्या 9 डावांमध्ये काही खास करता आलेलं नाही.तसेच अभिषेकला 3 डावांमध्ये दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे अभिषेकला डच्चू मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अभिषेकला डच्चू दिल्यास तिलक वर्मा संजू सॅमसनसह ओपनिंग करु शकतो.

रमनदीप सिंहला पदार्पणाची संधी मिळणार?

आता अभिषेक शर्माला डच्चू दिल्यास प्लेइंग ईलेव्हनमध्ये रमनदीप सिंग याला संधी दिली जाऊ शकते. रमनदीप बॅटिंगसह अप्रतिम फिल्डिंग करतो. त्यामुळे रमनदीप सिंहला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. अशात आता सूर्यकुमार काय निर्णय घेतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची संभावित प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सॅमसन, तिलक वर्मा, रमनदीप सिंह, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आवेश खान, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.

T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.