भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. बुमराह या मालिकेतील 5 पैकी 3 सामने खेळणार असल्याचं बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि हेड कोच गौतम गंभीर या दोघांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार बुमराह पाचव्या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट आहे. मात्र भारतीय संघ या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. (Photo Credit : Jasprit Bumrah X Account)
भारतासाठी पाचवा आणि अंतिम सामना हा अटीतटीचा आहे. भारताला मालिका बरोबरीत राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटने बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंट बाजूला करुन खेळवावं, असं क्रिकेट चाहत्यांना वाटतंय. मात्र काही रिपोर्ट्सनुसार बुमराह पाचव्या सामन्यात खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. बुमराहच्या जागी खेळण्यासाठी 3 गोलंदाजांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कॅप्टन शुबमन गिल त्या तिघांपैकी कुणाला संधी देणार? याची उत्सूकता चाहत्यांना आहे. (Photo Credit : Jasprit Bumrah X Account)
प्रसिध कृष्णा याने या मालिकेतील 4 पैकी 2 सामने खेळले आहेत. मात्र प्रसिधला या दोन्ही सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली. त्यामुळे प्रसिधला वगळण्यात आलं. त्यामुळे आता बुमराहच्या जागी या तिघांपैकी कुणाला संधी मिळते? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल. (Getty Images)
बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला संधी मिळू शकते. तसं झाल्यास अर्शदीपचं कसोटी पदार्पण ठरेल. अर्शदीपला चौथ्या कसोटीआधी सरावादरम्यान दुखापत झाली होती. (Photo Credit : PTI)
आकाश दीप याने एजबेस्टमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेट्स घेतल्या होत्या. आकाशला दुखापतीमुळे चौथ्या सामन्यात खेळता आलं नव्हतं. मात्र आकाश पाचव्या सामन्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे कर्णधार शुबमन आकाशला संधी देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)