'हिशोबात रहा, निवडणूक झाल्यावर बघून घेईन...', हेमंत रासनेंकडून मनसे उमेदवाराच्या कार्यकर्त्याला धमक्या, कसब्यात हाय व्होल्टेज ड्रामा
शिवानी पांढरे November 13, 2024 02:43 PM

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. पुण्यातील (Pune News) कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार गणेश भोकरे (Ganesh Bhokre) आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा दिसून येत आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांनी हेमंत रासने यांच्यावर नाव न घेता धमकी दिल्याचा आरोप केला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचं त्यांनी सोशल  मीडियावरील एका व्हिडिओत म्हटलं आहे. सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असा उल्लेख त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केला आहे. 

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेनंतर विरोधकांच्या पायाच्या खालची माती सरकली आहे, म्हणून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराकडून माझ्या सहकाऱ्यांना धमक्या येत आहेत. कसली भाषा करत आहेत, हिशोबात राहा निवडणूक झाल्यावर दाखवू अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचं त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. माझ्या सहकाऱ्यांना धमक्या द्यायच्या आधी या गणेश भोकरेला भिडा मी एकटा नाही. माझ्या मागे सर्व मित्र परिवार आहे आणि गोरगरीब जनता आहे, जे काही करायचं आहे ते समोर येऊन करा. तुम्ही सांगेल त्या ठिकाणी यायला मी तयार आहे असे गणेश भोकरे (Ganesh Bhokre) यांनी व्हिडिओ म्हटलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ganesh Bhokre MNS (@ganesh_bhokre_1010)

हिशोबात रहा, निवडणूक झाल्यावर बघून घेईन…

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार गणेश भोकरे आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा दिसून येतोय.पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांनी हेमंत रासने  यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कसली भाषा करत आहेत हिशोबात राहा निवडणूक झाल्यावर दाखवू अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याच 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितल आहे. मला जर अजून धमक्या आल्या तर मी थेट रासने यांच्या ऑफिसवर धडकणार असल्याचा इशारा गणेश भोकरे यांनी दिला आहे. 

आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात आहे. सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असा उल्लेख त्यांनी हेमंत रासने यांचा केला आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर विरोधकांच्या पायाच्या खालची माती सरकली आहे, म्हणून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवार कडून माझ्या सहकाऱ्यांना धमक्या यायला लागले आहेत. कसली भाषणा करत आहेत हिशोबात राहा निवडणूक झाल्यावर दाखवू अशा प्रकारच्या धमक्या देत आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.