IND vs SA 3rd T20I Pitch Report, Playing 11 and Weather Update: तिसऱ्या T20 सामन्यात कसे असेल पिच? पाऊस खोळंबा घालणार? वाचा सविस्तर
Times Now Marathi November 13, 2024 04:45 PM

India vs South Africa 3rd T20 Weather Report & Weather Update: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज (13 नोव्हेंबर) सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्कवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉस रात्री आठ वाजता होणार असून सामना रात्री साडेआठ वाजता सुरू होईल. 4 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा सामना जिंकून दोन्ही संघांना मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. या सामन्यात पिच कसे असेल हवामान कसे असेल ते जाणून घेऊयात.

कसे असेल सेंच्युरियनमधील पिच? (IND vs SA 3rd T20I Pitch Report)

सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कच्या पिचचे वैशिष्ट्य म्हणजे ते वेगवान गोलंदाजांना मदत करते. येथील खेळपट्टीवर भरपूर बाऊंस आणि पेस आहे, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळते. दक्षिण आफ्रिकेतील इतर खेळपट्ट्यांपेक्षा येथे चेंडू बॅटवर वेगाने आदळतो आणि त्याची चेंडूची उसळी फलंदाजांसाठी आव्हान असते. त्यामुळे हे मैदान वेगवान गोलंदाजांसाठी स्वर्गासारखे आहे. येथे अनेक सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांनी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे टॉस जिंकल्यानंतर कर्णधार अनेकदा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो.

सेंच्युरियन मैदानावरील रेकॉर्ड

सेंच्युरियन सुपरस्पोर्ट पार्कमध्ये अनेक महत्त्वाचे सामने खेळले गेले आहेत. या स्टेडियमच्या T20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्डवर एक नजर टाकल्यास, या ठिकाणी 14 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. जिथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 7 सामने जिंकले आहेत आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 7 सामने जिंकले आहेत. या मैदानावरील मागील 5 सामन्यांतील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 192 धावा आणि दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 194 धावा अशी आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे.




कसे असेल हवामान? (IND vs SA 3rd T20 Weather)

Accuweather च्या अहवालानुसार, 13 नोव्हेंबर रोजी सेंचुरियनमध्ये पावसाची शक्यता केवळ 8 टक्के आहे. मात्र संध्याकाळी आकाश निरभ्र राहील असा अंदाज आहे. सेंच्युरियनमध्ये संध्याकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा सामना कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्याची आशा आहे. चाहते या सामन्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात.

टीम इंडियाचा वरचष्मा (IND vs SA Head to Head Record)

यांच्यात आतापर्यंत एकूण 29 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 16 सामने भारताने जिंकले आहेत. तसेच आफ्रिकन संघाने 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे.

सेंच्युरियनमध्ये भारताचा पराभव

भारतीय संघाने 2018 साली सेंच्युरियन मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, ज्यामध्ये आफ्रिकेने 6 विकेटने विजय मिळवला होता. आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेनने 69 धावांची खेळी करत आफ्रिकेला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अभिषेक शर्मा संघाबाहेर?

अभिषेक शर्मा खराब फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादव त्याला पुढील सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. अभिषेकला विश्रांतीची गरज आहे, जेणेकरून तो त्याच्या फलंदाजीवर काम करू शकेल. मात्र अभिषेक बाहेर पडल्यास सलामीला कोण खेळणार हा प्रश्न आहे. या जागेसाठी टिळक वर्मा हा चांगला पर्ययाय आहे. तो सावधपणे फलंदाजी करतो आणि गरज पडल्यास आक्रमक फलंदाजीही करु शकतो.

रमणदीपला पदार्पणाची संधी मिळणार?

अभिषेकच्या जागी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रमणदीप सिंगला संधी मिळू शकते. तो सध्या जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. तो उत्कृष्ट फलंदाजीही करतो. दुसऱ्या सामन्यात भारताची फलंदाजी खराब झाल्याने संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. रमणदीपच्या समावेशामुळे फलंदाजीत सुधारणा होऊ शकते. मात्र आता सूर्यकुमार यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये हा बदल करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सामना लाईव्ह कुठे पाहू शकता? ( ind vs sa 3 t20 Where to Watch)

क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना भारतातील स्पोर्ट्स 18 चॅनलवर थेट पाहता येईल. याशिवाय जिओ सिनेमा ॲपवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग केले जाणार आहे. Jio Cinema ॲपवर चाहत्यांना या सामन्याचा मोफत आनंद घेता येणार आहे.

T20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ (South Africa Squad)

एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर, मिहलाली मपोन्गवाना, ओनो फेर्नोवाना, ओनो फेर्ने. बार्टमन, रीझा हेंड्रिक्स

T20 मालिकेसाठी भारतीय संघ (India Squad)

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान, जितेश शर्मा, विजयकुमार विशाख, रमणदीप सिंग, यश दयाल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.