तुम्ही केवळ आरोपी आहेत म्हणून कुणाचे घर पाडू शकत नाही. अधिकारी आणि सरकारची मनमानी वृत्ती योग्य नाही, देशात कायद्याचे राज्य हवे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने सरकार आणि प्रशासनाला सुनावलं आहे.
Maharashtra Assembly Election : महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट चांगला - रोहित पवारमहाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट चांगला असून राज्यात जवळपास 170 जागा निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसंच खासकरून विदर्भात सर्वाधिक चांगला स्ट्राईक रेट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut Live News : महाराष्ट्रातील उद्योग अदानीला विकण्यात मोदी-फडणवीस यशस्वी झाले - संजय राऊतशिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यामागे अदानीचा हात होता आणि सरकार पाडण्यामागे देखील अदानी होता हे अजित पवार कबूल करत आहेत. यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो? ही मुंबई आणि महाराष्ट्रातील उद्योग अदानीला विकण्याचा डाव नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
By-election 2024 Live Updates : वायनाडमध्ये प्रियांका गांधी आणि नव्या हरिदास यांच्यात लढतबिहार, बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आसामसह देशातील 11 राज्यातील 31 विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. तर राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभेचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी देखील आज मतदान होत आहे. या ठिकाणी काँग्रेसकडून प्रियंका गांधी तर भाजपकडून नव्या हरिदास यांची उमेदवारी देण्यात आली आहेत.
Dhananjay Munde Live News : आव्हाडांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान - मुंडेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे झाल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. मुंब्रा येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.
Jharkhand Election Live : झारखंड विधानसभेसाठी आज मतदानझारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण 43 जागांसाठी आज मतदान होणार आहे.
NCP MLA disqualification case Maharashtra Live News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम सुनावणीकेंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाविरोधात शरद पवारांनी याचिका दाखल केली आहे. मागच्या सुनावणी वेळी कोर्टाने अजित पवारांना राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रात 36 तासांच्या आत पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असा उल्लेख असलेली जाहिरात देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज या प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.