बुधनी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान करण्यापूर्वी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या पत्नीसह पूजा केली.
केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी कोडरमा येथील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर आपले शाईचे बोट दाखवत आहेत
सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री, प्रिन्स फैसल बिन फरहान अल-सौद, दोन दिवस भारत दौऱ्यावर आहेत.
Supreme Court LIVE : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-घड्याळ चिन्ह प्रकरण : सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणीनवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी याचिका दाखल केली होती. मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने अजित पवार यांना महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमान पत्रात ३६ तासांच्या आत जाहिरात देण्याचे निर्देश दिले होते. कोर्टाच्या निर्देशानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांच्या पक्षाकडून जाहिराती देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोर्टात आज होत असलेली सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.
Raj Thackeray Sabha LIVE : आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंची वरळीतील जांबोरी मैदानावर दुसरी जाहीर सभाआदित्य ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरे यांची आज दुसरी जाहीर सभा आहे. आज वरळीतील जांबोरी मैदानात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. ७ नोव्हेंबरला वरळी कोळीवाड्यात राज ठाकरे यांची पहिली सभा झाली होती. आज राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
Jharkhand Assembly Elections LIVE : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदानझारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी आज मतदान होत आहे. सोबतच १० राज्यातील ३१ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान आहे. राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभेचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना वायनाडमधून उमेदवारी दिलीये. तर, भाजपकडून नव्या हरिदास या रिंगणात आहेत.
Pune Weather Update LIVE : पुण्यात थंडीची चाहूल, पुढील दोन दिवस स्थिर तापमान राहणारगेल्या चार दिवसांपासून पुण्यात कमाल आणि किमान तापमानामध्ये सातत्याने घट होत असून, मध्यरात्रीनंतर वाढत जाणारा हवेतील गारवा आणि सकाळच्या आल्हाददायक वातावरणामुळे पुणेकरांना थंडीची चाहूल लागली आहे. सकाळी गारवा आणि धुक्याचाही अनुभव मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शहरात मंगळवारी शिवाजीनगर येथे १५, तर एनडीए १३.३ आणि हवेली परिसरात पारा १२.९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता.
Tamil Nadu Rains LIVE : तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची जोरदार हजेरीतामिळनाडू : कुड्डालोर जिल्ह्यातील अनेक भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
बंगळूर : कर्नाटक लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मंगळवारी राज्यातील विविध भागांत अकरा सरकारी अधिकाऱ्यांच्या ४० मिळकतींवर छापे टाकले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. यावेळी कागदपत्रे, मालमत्ता आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या, तर कागदपत्रे तपासली जात आहेत. बेळगाव, हावेरी, दावणगेरे, गुलबर्गा, म्हैसूर, रामनगर आणि धारवाडसह अनेक अधिकाऱ्यांशी संबंधित विविध ठिकाणी छापे टाकले.
Sharad Pawar Sabha LIVE : शरद पवार यांची आज भोसरीतील गावजत्रा मैदानावर जाहीर सभाराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भोसरीतील गाव जत्रा मैदानावर जाहीर सभा होणार आहे. तर, उद्या पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात रोड-शो होणार आहे.
Dhairyasheel Mane LIVE : केंद्रीय वस्त्रोद्योग सल्लागार समितीच्या सदस्यपदी खासदार धैर्यशील मानेंची फेरनिवडLatest Marathi Live Updates 13 November 2024 : झारखंडमधे पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी आज मतदान होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते, असा दावा काँग्रेसचे नेते सय्यद अजीम पीर खादरी यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. खासदार धैर्यशील माने यांची केंद्रीय वस्त्रोद्योग सल्लागार समितीच्या सदस्यपदी फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच नाखरे-कालकरकोंड भागात चिरेखाणीवर बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी पहाटेच्या सुमारास जेरबंद केलेय. आघाडीवाले म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे खिलाडी. आघाडीला लुटीचे लायसन्स देऊ नका, असे आवाहन पंतप्रधान यांनी केले. क्रांतीभूमी चिमूर येथे आयोजित महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. त्याचबरोबर राज्यातील काही भागात आज ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..