समोरासमोर चर्चा होऊनच जाऊ दे, कुठं कुठं पाणी मुरलंय समोर येईल; छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचे आव्हान
प्रशांत देसाई November 13, 2024 07:13 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आमच्या सहकाऱ्याने पक्ष फोडला, तेव्हा भुजबळ सकाळी आले, जे झालं ते वाईट झालं, समजूत काढायला जाऊ का असं मला विचारलं. भुजबळ साहेब गेले ते परत आलेच नाही, आणि दुसऱ्या दिवशी शपथच घेतली, असे म्हणत  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी मंत्री छगन भुजबळांवर(Chhagan Bhujbal) जोरदार हल्लाोबल केला. एखाद्या माणसानं चुकीचे काम करताना काही मर्यादा असतात, त्या भुजबळ यांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, अशा लोकांना पुन्हा निवडुन द्यायचं नाही हा विचार तुम्ही करायचा आहे. असे आवाहन करत शरद पवारांनी येवला येथील सभेतून येवलेकरांना साद घातली.  

दरम्यान, याच मुद्यावरून छगन भुजबळांनी देखील पलटवार करत सडकून टीका केली होती. अशातच या मुद्यावरुन रोहित पवारांनी (Rohit Pawar) मंत्री छगन भुजबळांना थेट आव्हान दिले आहे. छगन भुजबळांची जी भूमिका असेल. तशी शरद पवारांचीही भूमिका अशीच आहे, ज्यांचं कुणाचं काही चुकलं असेल, ज्या गोष्टीवर या राज्यावर अन्याय झाला असेल. त्यावर चर्चा व्हावी, अशी पवार साहेबांची इच्छा आहे. जर कोणी नेते भाजपसोबत गेले त्यांची इच्छा असेल की चर्चा व्हावी, तर होऊन जाऊ देतं समोरासमोर चर्चा, कोण काय बोलतात बघू. कोण काय काय बोलतोय कुठे कुठे पाणी मुरलंय, हे त्या ठिकाणी चर्चा होईल. राज्यात महाविकास आघाडीच्या 167 ते 180 जागा येतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त करतानाच छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरही चांगलाच टोला हाणलाय.

.....तर कशाला हवेत गोळ्या मारायच्या?

अजित दादा आता भाजप बरोबर गेले आहेत, त्यामुळे भाजपसोबत गेल्यानंतर ते आज काहीही बोलतील. माझी एकच विनंती आहे. गौतम अदानी साहेबांनाचं पुढे करा, पत्रकारांना विचारू द्या, खर काय होतं. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, कशाला हवेत गोळ्या मारायच्या? पहाटेच्या शपथवधीच्या बैठकीला गौतम अदानीसह शरद पवार उपस्थित होते, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. त्यावर रोहित पवार बोलत होते.

भाजपची संगत असल्यामुळे सरकारमध्ये बेशिस्तपणा 

इंग्लिशचा विषय तसा कुठे येत नाही. पण, सहा लाख कोटीच बजेट मांडण्यासाठी लॉजिक नक्कीच लागतं. जेव्हा काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत अजित दादा होते, तेव्हा बजेटबद्दल सांगताना ते आम्हाला सांगत होते की, आपल्याला काही बाबतीत राहावं लागतं, काही निर्णय आपल्याला स्ट्रीक्ट  रहावं लागतं. आयुष्याचा विचार करावा लागतो. चांगल्या प्रकारे राहावं लागतं. पण आता भाजपसोबत गेल्यानंतर शिस्तपणा त्यांच्यात राहिलेला नाही. बेशिस्तपणा हा त्यांच्या ट्रेजेरीमध्ये आलेला आहे. अनेकवेळा बजेट त्यांनी मांडला असला तरी हा फरक इथे का जाणवतो. भाजपची संगत असल्यामुळे फारच जास्त बेशिस्तपणा सरकारमध्ये आलाय.

चंद्रशेखर बावनकुकुळेंनी हार मानली का?

पुढच्या बारा दिवसात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि मुख्यमंत्र्याची चर्चा होणार, असं त्यांना वाटतं असेल याचा अर्थ आजचं बावनकुळे साहेबांनी हार मानलेली आहे, भाजप आता सत्तेत येत नाही. त्यांनी काय बोललं यापेक्षा महाविकास आघाडीचे सर्व नेते आम्ही याबाबत निर्णय घेऊ. मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही, मी कार्यकर्ता म्हणून महाविकास आघाडीसाठी फिरत आहे. निर्णय शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी घेतील, असा टोला रोहित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीमध्ये रोहित पवार, उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्यासह बारा, बारा नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची टीका केली त्यावर रोहित पवार बोलत होते.

लाडक्या बहिणींना पैसेच पैसे, महायुती 2100, मविआ 3000 तर वंचित देणार 3500 रुपये, कोणी नेमकं काय आश्वासन दिलं?

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.