पुरुषांमधील वंध्यत्वावर ‘हा’ उपाय ठरेल रामबाण
GH News November 15, 2024 11:11 PM

शरीर निरोगी आणि बलवान राहवे, यासाठी काय करावे? असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडत असेल. विविध प्रयत्न करूनही तुम्हाला अपेक्षित यश मिळत नसेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत, ज्यापासून तुम्ही निरोगी राहू शकतात. शारीरिक दुर्बलता किंवा वंध्यत्व दूर करण्यासाठी आयुर्वेद आणि नैसर्गिक गोष्टींचा आधार घेतल्यास ते खूप फायदेशीर ठरू शकते. तसेच त्याचे कोणतेही विपरीत परिणाम होणार नाही.

बदाम हा एक चांगला पर्याय आहे. मेंदूच्या विकासासाठी बदाम खूप महत्वाचा आहे. पण, आज आम्ही पर्वतीय बदामांबद्दल बोलत आहोत, ज्यांना चिलगोझा असेही म्हणतात. पुरुषांमधील शारीरिक कमकुवतपणा दूर करण्यासाठी ही जबरदस्त गोष्ट खूप फायदेशीर आहे.

बदामाचे फायदे कोणते?

बदामात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते. यामुळे शरीरातील चरबी वाढत नाही आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते हे स्नायूंच्या विकासासाठी महत्वाचे मानले जाते.

बदामात व्हिटॅमिन बी, ई, कॅल्शियम, लोह असते ज्यामुळे थकवा, अशक्तपणा दूर होतो आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते.

बदामात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीव्हायरस गुणधर्म असल्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि हानिकारक रोगांपासून बचाव होतो.

चरबीमध्ये एकूण कॅलरीपैकी 3/4 कॅलरी असतात, उर्वरित कार्बोहायड्रेट आणि प्रथिनांमधून येतात. त्याचा ग्लाइसेमिक लोड शून्य असतो. यात कार्बोहायड्रेट खूप कमी असते. त्यामुळे बदामापासून बनवलेले केक किंवा बिस्किटेही मधुमेही रुग्णांना घेता येतात.

आयुर्वेदात हे बुद्धी आणि मज्जातंतूंसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. भारतात हा काश्मीरचा राज्यवृक्ष मानला जातो. बदामाच्या एक औंस (28 ग्रॅम) मध्ये 160 कॅलरी असतात, म्हणून ते शरीराला उर्जा प्रदान करते. परंतु जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा देखील होऊ शकतो.

बदामातील फॅट: सिंगल अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड. हे फायदेशीर फॅट आहे, ज्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होते आणि हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.

इतिहास काय सांगतो?

बदाम हे मूळचे मध्यपूर्वेतील एक झाड आहे. हेच नाव या झाडाच्या बीजाला दिले जाते. त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. बदाम हा एक प्रकारचा मेवा आहे. संस्कृत भाषेत याला वाताद, वटवैरी असं म्हणतात. , हिंदी, मराठी, गुजराती आणि बंगालीमध्ये बदाम, फारसीमध्ये बदाम शोरी, बदाम तल्ख, इंग्रजीत आलमंड आणि लॅटिनमध्ये अमिग्ड्रेलस कम्युनीज असे म्हणतात.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.