South Africa vs India 4th T20I : भारताचा सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात शानदार फलंदाजी करत 51 चेंडूत शतक झळकावले. सॅमसनने पहिल्या सामन्यातही शतक झळकावले होते, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. मात्र, या सामन्यात त्याने दमदार पुनरागमन करत आणखी एक शतक झळकावले. सॅमसनचे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. यष्टिरक्षकांमध्ये सर्वाधिक टी-20 शतके करण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे.
याआधी संजू सॅमसनला मालिकेतील दोन बॅक टू बॅक मॅचमध्ये खातेही उघडता आले नव्हते. मात्र, या मालिकेतील पहिल्याच सामन्यात संजूने धमाकेदार शतक ठोकले होते. सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने दमदार पुनरागमन केले. चौथ्या टी-20 सामन्यात संजूने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी
अभिषेक शर्माच्या साथीने संजू सॅमसनने झंझावाती सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. मात्र, अभिषेक शर्माला त्याची झंझावाती सुरुवात मोठ्या डावात करता आली नाही. अभिषेक शर्मा 18 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. या खेळीत अभिषेकने 4 षटकार आणि 2 चौकारही मारले.
या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकली
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याआधी झालेल्या तीन सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवला नाणेफेक जिंकता आली नव्हती. या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने तीनपैकी 2 सामने जिंकून 2-1 अशी अभेद्य आघाडी घेतली होती. अशा स्थितीत भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेवर 3-1 असा विजय नोंदविण्याकडे लक्ष देईल.
भारताची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी विश्नोई, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन
रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (सी), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (सी), डेव्हिड मिलर, मार्को जेन्सेन, जेराल्ड कोएत्झी, अँडिले सिमेलेन, केशव महाराज, लुथो सिपामाला
अधिक पाहा..