बीड : राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानंतर बीडमधून अनेक नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत सहभागी झाले. परंतु, या नेत्यांमध्ये गटबाजी आणि नाराजी होती.
आता निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री धनंजय मुंडेंनी सर्वांना एकत्र करत ही ताकद महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या मागे उभी केली.
पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते, माजी गटनेते फारुक पटेल, माजी माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, मोईन मास्टर, महादेव उबाळे, बाळासाहेब गुजर, बरकत पठाण, अलीम पटेल, जीवन घोलप, रामदास सरवदे, संतोष क्षीरसागर, संभाजी काळे.
नंदू गवळी, बाळासाहेब धोत्रे, गौरव जावळे, शकील खान, आक्रम बागवान हे सर्वजणांशी धनंजय मुंडे यांनी संवाद साधल्यानंतर मग अजित पवार यांनीही एकत्र काम करण्याचा कानमंत्र दिला.
मग, हे सगळेच नेते सभेला उपस्थित राहीले.
त्यानंतर सभेतही भगवान सेनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत सानप, मराठा चळवळीतील अशोक हिंगे, माजी नगरसेवक आमेर, पी.वाय. जोगदंड, नवीद उज्जमा, ज्येष्ठ नेते सयाजी शिंदे, पंकज बाहेगव्हाणकर.
श्रीमंत सोनवणे, शिकुर सौदागर, सुधीर नाईकवाडे, सरपंच श्रीकृष्ण चौधरी, सरपंच सचिन जोगदंड, सरपंच बाळासाहेब हगारे, उमेश आंधळे, संजीव माने, दादाराव कळासे, संभाजी जोगदंड, विलास सोनवणे, जफर भाई, कामरान खान, नजीर खान, चंद्रकांत चौधरी, अमर जोगदंड, उमेश जोगदंड, राजेंद्र व्यवहारे, सोमिनाथ कवडे, साहेबराव काटे यांनी प्रवेश केला.
#ElectionWithSakal