सलग 2 शतकानंतर सलग 2 वेळा भोपळा फोडण्यात अपयशी ठरलेल्या संजू सॅमसन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम टी20i सामन्यात सुपर कमबॅक केलं आहे. संजू सॅमसने जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात झंझावाती खेळी करत स्फोटक अर्धशतक ठोकलं आहे. संजूच्या टी 20i कारकीर्दीतील हे तिसरं अर्धशतक ठरलं आहे. संजूच्या या खेळीमुळे टीम इंडियाला वेगवान सुरुवात मिळाली आहे. तसेच आता संजू या अर्धशतकाचं शतकात रुपांतर करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
ट्रिस्टन स्टब्स दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाच्या डावातील 10 वी ओव्हर टाकायला आला. संजूने ट्रिस्टनला पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स खेचला आणि अर्धशतक पूर्ण केलं.संजूने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक झळकावलं आणि टीकाकारांना चोख उत्तर दिलं.
संजू सॅमसन याने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात सलग 2 शतकं झळकावली. संजू टी 20I क्रिकेटमध्ये सलग 2 शतकं करणारा पहिला भारतीय ठरला. त्यामुळे संजूला दुसऱ्या टी 20I सामन्यात शतकांची हॅटट्रिक करण्याची संधी होती. मात्र संजू फ्लॉप ठरला. संजू सलग दुसर्या आणि तिसऱ्या सामन्यात भोपळाही फोडू शकला नाही. त्यामुळे संजू पु्न्ही टीकेचा धनी झाला. मात्र चौथ्या सामन्यात संजू पेटून उठला आणि त्याने अर्धशतक केलंय. आता तो शतक करतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संजूचा अर्धशतकी धमाका
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.