टीम इंडियाचा सलामीवीर संजू सॅमसन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम टी 20I सामन्यात स्फोटक खेळी केली. संजूने जोहान्सबर्ग येथे 56 बॉलमध्ये 6 फोर आणि 9 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 109 रन्स केल्या. संजूने मारलेल्या या 9 पैकी एका सिक्समुळे एक क्रिकेट चाहतीला दुखापत झाली. संजूने सिक्स खेचला आणि तो बॉल महिला चाहतीच्या चेहऱ्यावर आदळला. त्यामुळे त्या चाहतीला रडू कोसळलं. सुदैवाने तिला फार काही झालं नाही आणि अर्नथ टळला. मात्र या साऱ्या प्रकारामुळे मैदानातील वातावरण जरा गंभीर झालं होतं.
संजू सॅमसन तिलक वर्मा याच्या सोबतीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत होता. संजूने या दरम्यान 10 व्या ओव्हरमध्ये कडक सिक्स मारला. संजूने मारलेला हा सिक्स चाहतीच्या थेट तोंडावर जाऊन लागला नाही. संजूने डीप मिडविकेटवरुन हा फटका मारला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर रेलिंगवर जाऊन आदळला. त्यानंतर सुरक्षा रक्षकाच्या खांद्याला लागल्यानंतर बॉल त्या महिला चाहतीच्या तोंडावर आदळला. त्या महिलेचं लक्ष नसल्याने बॉल तिच्या चेहऱ्यावर येऊन लागला ज्यामुळे तिला असह्य वेदना झाल्या, ज्यामुळे तिला रडू कोसळलं.
त्या महिला चाहतीला बॉल लागल्याचं स्टेडियममधील बिग स्क्रीनवर दाखवण्यात आलं. त्यानंतर त्या महिलेला दुखापत झालेल्या भागावर शेक देण्यासाठी बर्फाचं पॅकेट दिलं. मैदानातील इतर चाहत्यांनी त्या महिलेला सहकार्य करत शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण मारलेल्या फटक्यामुळे चाहतीला दुखापत झाल्याचं समजताच मैदानातूनच संजूने इशाऱ्याने माफी मागितली. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अनर्थ टळला
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.