झोपी गेलेल्यांना जागं करण्याची हीच योग्य वेळ, म्हणत फडणवीसांचं ट्वीट; मोठा गौप्यस्फोट करणार?
नामदेव जगताप November 16, 2024 12:13 PM

Kirit Somaya on Maulana Sajjad Nomani : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) आखाड्यात सर्वच पक्षातील दिग्गज उतरले असून आपापल्या परीनं मतदारांना आश्वासनं दिली जात आहेत. अशातच मतदारराजा नेमका कौल कुणाला देणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. अशातच जाहीर सभांमध्ये बोलताना अनेक विविध घोषणा दिल्या जात आहेत. तर, विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. असाच एक मुद्दा महायुतीकडून यंदाच्या प्रचारात लावून धरण्यात आला आहे, तो म्हणजे 'व्होट जिहाद'चा.  अशातच आता भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांकडून (Kirit Somaiya) निवडणूक आयोगाला पत्र (Letter To Election Commission) लिहून मौलाना सज्जाद नोमानींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, खडकवासलामधल्या सभेत फडणवीसांनीही नोमानींची ऑडिओ क्लिप ऐकवली होती. अशातच आता फडणवीसांनी ट्वीट केलं आहे. आज सकाळी साडेदहा वाजता झोपलेल्यांना जागे करण्याचं आवाहन, देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

भाजप नेते किरीट सोमय्यांनी सज्जाद नोमानींचा एक व्हिडीओ समोर आणला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्यांचे सोशल बॉयकॉट करा, असं आवाहन व्हिडीओद्वारे नोमानी करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याच व्हिडीओवरुन किरीट सोमय्यांनी मौलाना सज्जाद नोमानींवर व्होट जिहादचा आरोप केला आहे. तसेच, यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्रही लिहिलं आहे. तसेच, या पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे मौलाना सज्जाद नोमानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

आज सकाळी साडेदहा वाजता झोपलेल्यांना जागं करण्याचं आवाहन; फडणवीसांचं ट्वीट चर्चेत 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुस्लीम स्कॉलर सज्जाद नोमांनीच्या कथित क्लिपवरुन खूप आक्रमक झाले आहेत. फडणवीसांनी रात्री दहाच्या सुमारास एक्सवर पोस्ट आज सकाळी साडेदहा वाजता झोपलेल्यांना जागे करण्याचं आवाहन केलं आहे. यही समय है, सही समय है, सोए हुओं को जगाने का, असं म्हणत फडणवीसांनी ट्वीट केलं आहे. आज सकाळी साजेदहा वाजता ते नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करणार? झोपलेल्यांची झोप कशी उडवणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.   

यापूर्वी फडणवीसांना ऐकवलेली नोमानींची व्हिडीओ क्लिप 

पुण्यातल्या खडकवासलामधल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानींची ऑडिओ क्लिप ऐकवली. आणि त्यावरून महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. व्होट जिहादचा नारा दिला जात आहे, आता आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल, असं फडणवीस म्हणाले होते. 2012 ते 2024 दरम्यान महाराष्ट्रात घडलेल्या दंगलींमधल्या मुस्लीम आरोपींना सोडून द्या, अशी मागणी उलेमांनी केलीय आणि ती मविआनं मान्य केलीय, असा आरोपही फडणवीसांनी केला होता. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.