Nagpur Central VidhanSabha 2024: संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024)ची रणधुमाळीला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर मतदारांचा अंतिम कौल सर्वापुढे असणार आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राजकीय हालचालींना प्रचंड वेग आले असून सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जंगी प्रचार केला जात आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) यंदा मुख्य लढत होणार असून इतर अनेक पक्षदेखील यंदा निर्णायक ठरतील असे सध्याचे चित्र आहे.
दरम्यान राज्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणाऱ्या नागपुरातील 12 मतदारसंघासह मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात (Nagpur Central Assembly Constituency) यंदा कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण गेल्या तीन टर्म पासून भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघातील जातीय समीकरण बघता विधानसभेसाठी यंदा काट्याची टक्कर राहणार आहे. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम तसेच हलबा समाजाच्या मतदारांची लक्षणीय संख्या आहे. त्यामुळे हे जातीय समीकरण जुळवून विजयाचा मार्ग सुखर होऊ शकतो. मात्र भाजपने यंदा मागील वेळी काठावर पास झालेले विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना विश्राम देत प्रवीण दटके (Pravin Datke) यांना पुन्हा नव्याने संधी दिली आहे.
मागील तीन विधानसभा निवडणुकांपासून मध्य नागपूर भाजपचा गड असला तरी येथे सातत्याने घटते मताधिक्य ही पक्षासमोरील मोठी चिंता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून तरुण आणि तडफदार नेते बंटी शेळके (Bunty Shelke) यांना मैदानात उतरवत ही लढत अधिक रंगतदार झाली आहे. यंदा मध्य नागपुरात काँग्रेसकडून सुरवातीला ॲड. नंदा पराते आणि रमेश पुणेकर यांच्या नावाची चर्चा होती. तर भाजप कडूनही विद्यमान आमदार विकास कुंभारे, दीपक देवघरे, दीपराज पार्डीकर यांच्या नावाची चर्चा होती. परंतु काँग्रेसने बंटी शेळके यांना तर भाजपने प्रविण दटके यांना उमेदवारी जाहिर केली. त्यानंतर हलबा समाजातील सगळ्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांसह विविध हलबांशी संबंधित संघटना संतापल्या. दरम्यान हलबा समाजातील एक अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर यांनी देखील मैदानात उतरत ही लढत तिरंगी केली आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत कोण गुलाल उधळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पक्ष | 2024 | 2019 | 2014 |
भाजप | ९६,९०५ | ९६,३४६ | ९४,१६२ |
काँग्रेस | ७१,०४४ | ७३,८४९ | ५४,२१५ |
बसपा | १,०४९ | १ ६९२ | ५ ३७६ |
विकास कुंभारे - (भाजप)- ७५,६९२
बंटी शेळके - (काँग्रेस)- ७१,६८४
विकास कुंभारे - भाजप - ८७,५२३
अनीस अहमद - काँग्रेस- ४९.४५२
ओंकार अंजीकर - बसपा- ५,५३५
आभा पांडे- ४,८१८
मो. कामिल अन्सारी - राष्ट्रवादी काँग्रेस- ४,४४९
विकास कुंभारे - भाजप- ५६,३१२
राजू देवघरे - काँग्रेस- ४५, ५२१
हाजी गनी खान बसपा- २४,०३४
रवींद्र दुरुगकर अपक्ष ९, १५७
नंदा पराते - डीईएसईपी ४,९३९
हे ही वाचा