सज्जाद नोमानी यांच्यावर विश्व हिंदू परिषद: मौलाना सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांच्या विरोधात वोट जिहादच्या वक्तव्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या सर्व गोष्टींची थोडी तरी लाज वाटते की नाही. असा संतप्त सवाल करत विहिंपचे (VHP) महाराष्ट्र प्रांत महामंत्री गोविंद शेंडे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघातही कला आहे.
मौलाना नोमानी यांनी निवडणुकीच्या काळात मुद्दामून केलेले हे वक्तव्य आहे. लोकसभेमध्ये यांनी योजनाबद्ध पद्धतीने वोट जेहाद केलेला आहे. त्यामुळेच वोट जेहादचा उल्लेख केल्यावर यांना मिरची लागत आहे. भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांचा सामाजिक बहिष्कार करा, हे वक्तव्य लोकशाहीची खिल्ली उडवणे आहे, लोकशाहीचा अपमान आहे. निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यावे. तसेच हिंदू समाजाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि अशा लोकांना यांची जागा दाखवावी. असे आवाहनही गोविंद शेंडे यांनी यावेळी केले आहे.
मुस्लिम मतांची प्राप्ती व्हावी यासाठी जेवढ्या खालच्या स्तरावर जाता येईल, तेवढ्या खालच्या स्तरावर हे सर्व गेले आहेत… उलेमा बोर्डाच्या 17 सूत्री मागणीला यांनी स्वीकृती दिली, नाना पटोलेंनी सत्तेत आल्यावर विचार करू, असे लेखी पत्र दिलेय, याचा अर्थ काय होतो. यावरूनच दिसून येते हे वोट जिहादचे सिपहसालार आहेच. उर्वरित समाजाने या गोष्टी का सहन करून घ्यावं. असेही ते म्हणाले.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आता जनाब म्हटले जात आहे. यापेक्षा जास्त लज्जास्पद गोष्ट काय असू शकते. उद्धव ठाकरे तुम्हाला काही लाज वाटते की नाही. बाळासाहेबांनी जे काही उभं केलं, त्याच्यावर उद्धव ठाकरे पाणी फिरवत आहे. हिंदू समाज या सर्व गोष्टींकडे पाहत आहे. सज्जाद नोमानीचा वक्तव्य आणि त्यांचा वोट जिहादचा आव्हान देशाचे ऐकण्यासाठी अत्यंत घातक आहे. पंतप्रधान म्हणतात सबका साथ सबका विकास. मुस्लिम स्वतःला त्या सब मध्ये मानत नाही का. ते स्वतःला वेगळेच मानतात का? असा सवालही गोविंद शेंडे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
मौलाना सज्जाद नोमानी यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. समाजात तेढ निर्माण करणारे, समाजात फूट निर्माण करून राष्ट्र विरोधी वक्तव्य करणाऱ्या विरोधात राजकीय दृष्टिकोनातून ही कारवाई व्हावी आणि प्रशासनानं कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचेही गोविंद शेंडे म्हणाले.
हे ही वाचा
अधिक पाहा..