बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) उमेदवार युगेंद्र पवार, अशी लढत होत आहे. मात्र, युगेंद्र पवार यांच्यासाठी पवार कुटुंब प्रचारात उतरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार सुद्धा युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामतीत प्रचार करताना दिसत आहेत. यावरून अजितदादा चिडल्याचे पाहायला मिळाले. याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रतिभाकाकींना नातवाचा काय पुळका आलाय कळेना? असा सवाल अजितदादांनी उपस्थित करत एकच खदखद व्यक्त केली होती. मात्र, सगळ्यांचा प्रचार प्रतिभा यांनी केला आहे, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
– Advertisement –
हेही वाचा : महायुतीतच मेळ नाही! अजितदादा अन् पंकजा म्हणाल्या, ‘बटेंगे तो कटेंगे’ चालणार नाही; गडकरी म्हणतात…
अजितदादांनी काय म्हणाले?
– Advertisement –
“मी 1991 पासून आमदार आणि खासदार आहे. मात्र, तेव्हापासून कधी प्रतिभाकाकी प्रचारासाठी बाहेर आल्या का? आता काय नातवाचा पुळका आलाय कळेना मला… मी खाताडा, पेताडा, गंजडी असतो, तर ठीक आहे. मात्र, मी काकींना निवडणूक झाल्यावर विचारणार आहे, का नातवाचा पुळका आला होता?” असं अजितदादांनी बारामतीत जनतेला संबोधित करताना म्हटलं होतं.
पवार म्हणतात…
याबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनं प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, “प्रतिभा अनेकदा प्रचारात आल्या आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांनी प्रचार केला आहे. माझ्या प्रचारात त्या फारशा पडायच्या नाहीत. पण, बाकी सगळ्यांना प्रचार त्यांनी केला आहे.”
हेही वाचा : ‘बटेंगे तो कटेंगे’ महाराष्ट्रात चालणार नाही, अजितदादा आक्रमक; फडणवीस म्हणतात, “बहुधा त्यांना…”