Tirora Vidhan Sabha constituency: गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा-गोरेगाव विधानसभा (Tirora Vidhan Sabha constituency) क्षेत्राकडे लक्ष दिल्यास या मतदारसंघात भाजपाचे विजय रांहागडाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रविकांत उर्फ गुड्डू बोपचे यांच्यामध्ये दुहेरी लढत होत आहे. मात्र या मतदारसंघातही महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागलाय. त्यातच वंचितचा जोरही पाहायला मिळतोय. वंचिततर्फे अतुल गजभिये यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आदिवासी बहुल जिल्हा अशी गोंदिया (Gondiya Assembly Constituency) जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. गोंदिया जिल्ह्याला छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते. या गोंदिया जिल्ह्यात मोठे कारखाने नसले तरी, अनेक छोट्या लघु उद्योगातून नागरिक स्वयंरोजगार निर्माण करत आहेत. गोंदिया जिल्ह्यात मनोहर भाई पटेल यांच्यासारखे शिक्षण महर्षी होऊन गेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील हा जिल्हा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचं हे होमग्राऊंड आहे.
2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोंदिया विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. यामध्ये अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपाल अग्रवाल यांचा दारुण पराभव केला होता. या निवडणुकीत अपक्ष विनोद अग्रवाल यांना 1 लाख 2 हजार 996 इतकी मतं मिळाली होती. तर भाजपाचे गोपाल अग्रवाल यांना 75 हजार 827 मतं मिळाली होते. काँग्रेसचे अमर वराडे यांनी 8 हजार 938 मतं मिळवली होती. मोरगांव अर्जुनीमध्ये 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजपच्या राजकुमार बडोले यांचा पराभव केला होता. आमगाव देवरी या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांनी भाजपचे संजय पुराम यांचा पराभव केला होता. विधानसभेत 2019 साली भाजपचे विजय रहांगडाले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांचा तिरोडा-गोरेगाव मतदारसंघात पराभव केला होता.
Arjuni Morgaon Vidhan Sabha constituency: अर्जुनी-मोरगाव मतदारसंघात चौरंगी लढत, कोण मारणार बाजी?